Vaibhav Suryavanshi : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, डायरेक्ट 'या' संघाचा उप-कर्णधार बनवलं
Bihar Team squad Ranji Trophy 2025-26 : 14 वर्षीय भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याची आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी बिहार संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Vaibhav Suryavanshi Vice-Captain Bihar Team : 14 वर्षीय भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याची आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी बिहार संघाच्या उपकर्णधारपदी (Vice-Captain) निवड करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामाची सुरुवात 15 ऑक्टोबरपासून होणार आहे. केवळ 14 वर्षांच्या वयात आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे वैभव क्रिकेटविश्वात चर्चेत आहे. तो या रणजी हंगामातील पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहार संघाची उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. संघाचे नेतृत्व साकिबुल गनी करणार आहे.
वैभव सूर्यवंशी बिहार संघाचा उपकर्णधार (Vaibhav Suryavanshi Vice-Captain Bihar Team)
बिहार संघाचा पहिला सामना 15 ऑक्टोबरपासून अरुणाचल प्रदेशविरुद्ध होणार असून, बिहारला या वेळी प्लेट गटात ठेवण्यात आले आहे. तर दुसरा सामना 25 ऑक्टोबरपासून नाडियाड येथे मणिपूरविरुद्ध खेळवला जाईल. सध्या वैभव चांगल्या लयीत असून अलीकडेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चमकला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या यूथ टेस्ट सामन्यात त्याने केवळ 78 चेंडूंवर शतक झळकावले आणि दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याने 3 डावांत 133 धावा केल्या आणि भारताने ही यूथ टेस्ट मालिका 2-0 ने जिंकली.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वैभवचा धमाका
कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या तीन यूथ वनडे सामन्यांत वैभवने 124 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने 68 चेंडूंमध्ये 70 धावांची तुफानी खेळी खेळली होती. भारताने ही यूथ वनडे मालिका 3-0 ने जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला. जून-जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत वैभवने अफलातून कामगिरी केली होती. पाच सामन्यांत त्याने 174.01 च्या स्ट्राइक रेटने 355 धावा ठोकल्या आणि मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटीत मालिकेत तो अपेक्षेप्रमाणे चमकू शकला नाही आणि चार डावांत फक्त 90 धावांवर समाधान मानावे लागले.
📢 Bihar Squad Announced for 1st Two #RanjiTrophy Matches!
— Bihar Cricket Association (@BiharCriBoard) October 12, 2025
🧢 Captain: Sakibul Gani⁰⭐ Vice-Captain: Vaibhav Suryavanshi
A strong mix of youth & experience..⁰Vaibhav’s rise continues after a stellar IPL & U-19 season.. #TeamBihar #BiharCricket #Ranji2025 #VaibhavSuryavansh pic.twitter.com/vk9ScT97UC
रणजी ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा
आगामी रणजी ट्रॉफी हंगाम वैभव सूर्यवंशीसाठी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी ठरणार आहे. गेल्या दोन हंगामांत बिहारसाठी खेळलेल्या 5 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने केवळ 10 च्या सरासरीने 100 धावा केल्या असून, त्याचा सर्वोच्च स्कोर 41 राहिला आहे. त्यामुळे या हंगामात वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहारचा संघ (Bihar Ranji Trophy squad) : पियुष कुमार सिंग, भास्कर दुबे, साकीबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, आमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशू सिंग, खालिद आलम, सचिन कुमार.
हे ही वाचा -





















