Team India Harmanpreet Kaur : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवासाठी हरमनप्रीत कौरने कोणाला धरले जबाबदार; वर्ल्डकपमधून टीम इंडिया बाहेर? जाणून घ्या गणित
India Lost Australia Women's World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाने भारतावर मात करत इतिहास रचला.

India Lost Australia Women's World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाने भारतावर मात करत इतिहास रचला. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 48.5 षटकांत 330 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार एलिसा हिली हिने तुफानी शतक झळकावले, तिने केवळ 107 चेंडूत 3 षटकार आणि 21 चौकारांच्या मदतीने 142 धावा केल्या. तिच्यानंतर एलिस पेरीने नाबाद 47 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला 3 विकेटने विजय मिळवून दिला. हा महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला.
या विजयासह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत (ICC Women's World Cup 2025 Points Table) अव्वल स्थानी पोहोचले आहे, तर भारताला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने स्थिती थोडी कठीण झाली आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सामन्यानंतर नेमकी कुठे चुका झाला हे सांगितले.
हरमनप्रीत कौरने कोणाला धरले जबाबदार (Harmanpreet Kaur blames batting)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, आज आपण ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यावरून आम्ही आणखी 30-40 धावा करू शकलो असतो. मात्र, शेवटच्या 6-7 षटकांत आम्ही काही अंतरावर विकेट्स गमावत गेलो. पिच फलंदाजीसाठी उत्तम होती, पण आपण त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकलो नाही. आपल्या सलामीच्या फलंदाजांनी मागील काही सामन्यांपासून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या जोरावरच आपण इतके मोठे धावसंख्येचे लक्ष्य उभे करू शकलो. आजही आमची सुरुवात चांगली झाली, पण शेवटच्या 5 षटकांत आपण थोडं पिछाडीवर पडलो.
हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, गेल्या तीन सामन्यांत आम्ही मधल्या षटकांत चांगली फलंदाजी करू शकलो नव्हतो, तेव्हा खालच्या क्रमाने जबाबदारी घेतली आणि संघाला चांगला आधार दिला. पण आज पहिले 40 षटके अतिशय चांगली झाली, मात्र शेवटच्या 10 षटकांत आम्ही कमी पडलो. अशा गोष्टी सामन्यात होत असतात. प्रत्येक वेळी 100% कामगिरी करणे शक्य नसते, पण त्यानंतर पुन्हा सावरून परत येणे हेच महत्त्वाचं असतं. पुढील दोन सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि या सामन्यातून आम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा जिवंत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला तरी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा जिवंत आहेत. पुढील सर्व सामने भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. टीम इंडियाने आगामी तीन सामन्यांमधून एकही सामना गमावला तर सेमीफायनलचा मार्ग खूप कठीण होईल. टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांना अजूनही न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांशी खेळावे लागणार आहे.
Powered by Alyssa Healy’s blazing ton, Australia script a chase for the ages at #CWC25 😮💨
— ICC (@ICC) October 12, 2025
As it happened in #INDvAUS ➡️ https://t.co/sMieT6Altq pic.twitter.com/wV4uBq49Tb
हे ही वाचा -
















