Vaibhav Suryavanshi : टीम इंडियाचा सुपरस्टार पाकिस्तानविरुद्ध पुन्हा फेल! वैभव सूर्यवंशीने शॉट मारला, पण समजण्याआधीच सगळं संपलं; पाहा Video
India vs Pakistan U19 Asia Cup 2025 : अंडर-19 आशिया कपमध्ये भारत–पाकिस्तान महामुकाबला सुरू झाला असून सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

India U19 vs Pakistan U19 ACC Mens U19 Asia Cup 2025 : अंडर-19 आशिया कपमध्ये भारत–पाकिस्तान महामुकाबला सुरू झाला असून सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यानेही आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर आधी गोलंदाजीच केली असती, असे स्पष्ट केले होते.
SEYAM DISMISSES VAIBHAV SURYAVANSHI FOR 5 RUNS ❤️🔥🍿 pic.twitter.com/qmjDd0SnJg
— PCT Replays 2.0 (@ReplaysPCT) December 14, 2025
वैभव सूर्यवंशी फक्त 5 धावा करू OUT
पाकिस्तानविरुद्ध सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. यूएईविरुद्धच्या सामन्यात वैभवने 95 चेंडूत 171 धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र पाकिस्तानविरुद्ध तो फॉर्म कायम राखू शकला नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीसमोर पहिलीच चेंडूवर जोरदार अपील झाली. अली राजाच्या या चेंडूवर अंपायरने अपील फेटाळले. मात्र काही वेळातच मोहम्मद सय्यामने वैभवला 5 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. भारताची पहिली विकेट 29 धावांवर पडली. त्या वेळी आयुष म्हात्रे 14 चेंडूत 23 धावा करत आक्रमक खेळ करत होता.
SEYAM DISMISSES VAIBHAV SURYAVANSHI FOR 5 RUNS ❤️🔥🍿 pic.twitter.com/qmjDd0SnJg
— PCT Replays 2.0 (@ReplaysPCT) December 14, 2025
भारतीय संघाची Playing XI -
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन सिंग, हेनिल पटेल.
पाकिस्तान संघाची Playing XI -
उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलोच, अहमद हुसैन, फरहान युसूफ (कर्णधार), हमजा जहूर, हुजैफा अहसान, निकाब शफीक, मोहम्मद सुभान, मोहम्मद सय्यम, अली राजा.
भारत-पाकिस्तान सामन्यात षटके कमी...
अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना प्रत्येकी 49 षटकांचा खेळला जाईल. म्हणजे पावसामुळे एक ओव्हर कमी झाली आहे.
हे ही वाचा -





















