एक्स्प्लोर

U19 World Cup : फायनलचं तिकिट कोणाला? उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान

India vs Australia Semifinal Under 19 World Cup 2022 : 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे.

India vs Australia Semifinal Under 19 World Cup 2022: क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आणि मैदानाबाहेर कोरोनाला धूळ चारणाऱ्या टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाला नमवत अंतिम फेरीत धडक मारण्यास टीम इंडिया उत्सुक आहे. 

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक मोहिमेत टीम इंडियासमोर संकटे आली होती. टीम इंडियातील प्रमुख खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने साखळी गटातील चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशवर मात करत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. 

टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला

कोरोना महासाथीचा परिणाम टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेवरही झाला होता. मागील दोन वर्षात कोणतेही राष्ट्रीय शिबीर अथवा मोठे स्पर्धा सामने झाले नव्हते. विश्वचषक सुरू होण्याआधी टीम इंडियाने आशिया चषक सहभाग घेतला होता. आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार यश धुल, शेख रशीद, हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, राज बावा यांच्या खांद्यावर फलंदाजीची भिस्त असणार. तर, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर, फिरकीपटू विकी ओस्तवाल, कौशल तांबे यांना प्रभावी मारा करावा लागणार आहे. 

भारतीय संघाने विश्वचषकातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती तर, ऑस्ट्रेलियन संघदेखील उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक दोन वेळेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, भारताने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली होती. 

आकडेवारी भारताच्या बाजूने 

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व दिसून आले आहे. नॉकनाउट सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामने झाले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला. टीम इंडियाने 2012 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. तर, 2000 मध्ये पार पडलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 

सामन्याची वेळ?

भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 6.30 वाजता उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या वाहिन्यांवर हा उपांत्य फेरीचा सामना पाहता येऊ शकतो. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Mutton Party : ना हॉटेल, ना फाईव्ह स्टार मेजवानी, अस्सल देशी पार्टी! सूर्याचा जमिनीवर बसून मटणावर ताव, सरफराज खान काय म्हणाला? पाहा VIDEO
ना हॉटेल, ना फाईव्ह स्टार मेजवानी, अस्सल देशी पार्टी! सूर्याचा जमिनीवर बसून मटणावर ताव, सरफराज खान काय म्हणाला? पाहा VIDEO
IND vs NZ 5th ODI Live Score : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाची दाणादाण! अक्षर-ईशानची झुंजही अपयशी, न्यूझीलंडसमोर किती धावांचं लक्ष्य?
IND vs NZ 5th ODI Live : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाची दाणादाण! अक्षर-ईशानची झुंजही अपयशी, न्यूझीलंडसमोर किती धावांचं लक्ष्य?
Ind vs Pak Asia Cup Rising Stars : तरुण पोरांनी आधी लोळावलं, आता तिलक वर्मा अन् वैभव सूर्यवंशी धुलाई करणार! याच महिन्यात IND vs PAK पुन्हा भिडणार, कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या A टू Z
तरुण पोरांनी आधी लोळावलं, आता तिलक वर्मा अन् वैभव सूर्यवंशी धुलाई करणार! याच महिन्यात IND vs PAK पुन्हा भिडणार, कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या A टू Z
IND vs NZ 5th ODI : पैसे मोजले, सबस्क्रिप्शन घेतलं, पण भारत-न्यूझीलंडचा सामना पाहताच येईना! SonyLIV कडून पाचव्या सामन्यात मोठी चूक, नेमकं काय घडलं?
पैसे मोजले, सबस्क्रिप्शन घेतलं, पण भारत-न्यूझीलंडचा सामना पाहताच येईना! SonyLIV कडून पाचव्या सामन्यात मोठी चूक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Embed widget