Umesh Yadav : तब्बल 43 महिन्यानंतर उमेश यादव खेळणार आंतरराष्ट्रीय टी20 सामना, शमीच्या जागी संघात वर्णी
AUS vs IND : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान सामन्यांपूर्वी शमीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे उमेश यादवला संधी मिळाली आहे.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) मालिकेपूर्वीच अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो सामन्यांना मुकणार असल्याचं समोर आलं. दरम्यान शमीच्या जागी उमेश यादव (Umesh Yadav) याला संघात संधी दिल्याचंही बीसीसीआयनं (BCCI) कळवलं. त्यामुळे आता जवळपास 43 महिन्यानंतर उमेश पुन्हा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार आहे. मोहालीमध्ये पहिला सामना होणार असल्याने यादव रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी 7 च्या सुमारास चंदीगडला पोहोचला आहे. टीम इंडियाचे इतरही खेळाडू पंजाबमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान उमेश लवकरात लवकर सामन्याच्या ठिकाणी पोहोचल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास तो 43 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दिसणार आहे. याआधी, तो फेब्रुवारी 2019 मध्ये शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा सामनाही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळला होता. दुसरीकडे उमेशने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शानदार प्रदर्शन केलं. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने 7 च्या इकोनॉमी रेटने 14 सामन्यात16 विकेट्स घेतल्या.
अशी आहे टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, उमेश यादव, दीपक चाहर.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20/09/2022 | ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 23/09/2022 | विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र |
तिसरा टी-20 सामना | 25/09/2022 | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद |
हे देखील वाचा-