IND vs ENG : भारतीय महिलांनी जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय, पाहा दोघांची अंतिम 11
IND vs ENG 1st ODI : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली असून भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे.
IND vs ENG 1st ODI Women Cricket : भारत आणि इंग्लंड (India vs England) महिला संघामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. टी20 सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने गमावल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. ती मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. आजचा आणि मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना होव येथील काऊंटी ग्राऊंडमध्ये खेळवला जात आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघाचा विचार करता हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखाली दमदार संघ मैदानात उतरला आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा यांनी सलामी केल्यानंतर हरमनप्रीत कौर, हरलीन देवोल मधल्या फळीत असतील. अष्टपैलू दिप्ती शर्मा तसंच विकेटकिपर यस्तिका भाटियाही संघात असणार आहे. पुजा वस्त्रकर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह यांच्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ आपल्या तगड्या खेळाडूंसह मैदानात उतरला असून अॅलिस कॅप्सी ही आज सलामीचा सामना खेळत आहे.
भारतीय संघ
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देवोल, दिप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, पुजा वस्त्रकर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह.
इंग्लंडचा संघ
एम्मा लॅम्ब, टॅमी ब्यूमॉन्ट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, डॅनियल व्याट, एमी जोन्स, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, केट क्रॉस, इस्सी वोंग
🚨 Toss & Team Update 🚨#TeamIndia have elected to bowl against England in the ODI series opener. #ENGvIND
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
Follow the match 👉 https://t.co/hhdN44agAS
A look at India's Playing XI 🔽 pic.twitter.com/X6ZbSRfGiz
इंग्लंडने जिंकली तिसरी टी-20 सामन्यांची मालिका
टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7विकेट्सी मात दिली. या विजयासह इंग्लंडने तिसरी टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. इंग्लंड महिलांनी पहिला टी-20 सामना 9 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर भारताने दुसरा टी-20 सामना 8 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पण अखेरचा सामना मात्र भारताला गमवावा लागल्याने मालिका 2-1 ने भारताच्या हातातून निसटली आहे.
हे देखील वाचा-