Tim David News : मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?
Tim David News : टिम डेव्हिडवर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Tim David News : टिम डेव्हिडवर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाच्या या स्फोटक फलंदाजावर मॅच फीच्या 30 टक्के दंडासह 2 डिमेरिट पॉइंट्सची शिक्षा ठोठावण्यात आली. 10 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ही घटना घडली होती. सामन्यादरम्यान आरसीबीच्या डगआउटमधून टिम डेव्हिडने मिडल फिंगर दाखवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आयपीएल प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.
आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, टिम डेव्हिडला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.6 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. हे कलम अश्लील, अपमानास्पद किंवा अवमानकारक इशारे करण्याशी संबंधित आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू टिम डेव्हिडवर लेव्हल-1 उल्लंघनासाठी मॅच फीच्या 30 टक्के दंडासह 2 डिमेरिट पॉइंट्सची कारवाई करण्यात आली आहे.” टिम डेव्हिडने आपली चूक मान्य करत मॅच रेफरी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.
🚨 Tim David has been fined 30% of his match fee and handed two demerit points for using an obscene gesture during RCB’s win over Mumbai Indians.
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) May 11, 2026
He now sits on three demerit points this season - one more will trigger a one-match ban. #IPL pic.twitter.com/t24oNfZZPw
आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार
विशेष म्हणजे, या आयपीएल हंगामात टिम डेव्हिडच्या खात्यात आता एकूण 3 डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत. यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे त्याच्यावर 25 टक्के दंड आणि 1 डिमेरिट पॉइंटची कारवाई झाली होती. आयपीएलच्या नियमांनुसार, आता टिम डेव्हिडला आणखी एक डिमेरिट पॉइंट मिळाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल.
बीसीसीआयने आयपीएल 2025 पासून खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी कडक डिमेरिट पॉइंट्स प्रणाली लागू केली आहे. हे डिमेरिट पॉइंट्स 36 महिन्यांपर्यंत कायम राहतात. 4 डिमेरिट पॉइंट्स पूर्ण झाल्यास एका सामन्याची बंदी लागू होते, तर त्यापेक्षा अधिक पॉइंट्स झाल्यास निलंबनाचा कालावधीही वाढू शकतो. त्यामुळे पुढील दोन हंगामांतही टिम डेव्हिडकडून आणखी चूक झाल्यास त्याला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते.
हे ही वाचा -




















