(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयडी मागितल्यानंतर टोल प्लाझा कर्मचाराच्या कानशिलात लगावली? डब्लूडब्लूई स्टार 'द ग्रेट खली'चा व्हिडिओ होतोय व्हायरल
The Great Khali: डब्लूडब्लूईचा (WWE) स्टार आणि माजी चॅम्पियन 'द ग्रेट खली' उर्फ दलीप सिंह राणा (Dalip Singh Rana) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
The Great Khali: डब्लूडब्लूईचा (WWE) स्टार आणि माजी चॅम्पियन 'द ग्रेट खली' उर्फ दलीप सिंह राणा (Dalip Singh Rana) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. खलीनं जालंधरहून कर्नालच्या दिशेनं जाताना फिल्लोर टोल प्लाझावरील कर्माचाऱ्याच्या कानशिलात लगावलीय. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. दरम्यान, ओळखपत्र मागितलं म्हणून त्यानं संबंधित कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं सांगितलं जातंय. तर, सबंधित कर्मचाऱ्यानं फोटो काढण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचं खलीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हिडिओ-
भारतीय कुस्तीपटू खली जालंधरहून कर्नालला जात होता. या प्रवासादरम्यान फिल्लोरजवळील टोल प्लाझा येथील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीनं कारमध्ये घुसून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तसेच ब्लॅकमेलही केलं. परंतु, नकार दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी माझ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली, असं खलीनं म्हटलं आहे. दुसरीकडं टोल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनं खलीकडून ओळखपत्र मागितले होतं, त्यानंतर खलीनं कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर खली घटनास्थळावरून निघून गेला.
टोल प्रकरणावर खलीचं स्पष्टीकरण-
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खलीनं एका व्हिडिओ द्वारे या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलंय. इन्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये खली म्हणाला की, "टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी मला कारमधून खाली उतरून सर्वांसोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती केली. एवढेच नव्हे तर फोटो काढल्यानंतरच जाऊ देऊ, असंही त्यांनी मला ब्लॅकमेल केलं. तिथूनच हा वाद सुरू झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवर लोक आपपली प्रतिक्रिया देत आहेत. टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही सेलिब्रिटीसोबत असं वर्तन होऊ नये, अशी माझी इच्छा आहे."
हे देखील वाचा-