टेनिसची मॅच सुरु असताना ट्विस्ट, प्रेक्षकांमध्ये एक्स बॉयफ्रेंड दिसताच महिला खेळाडू थबकली, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या अन्...
खेळाच्या मैदानावर रोज काही ना काही घडतंच. खेळाडू कधी अप्रतिम कामगिरी करून दाखवतात, तर कधी अनपेक्षित प्रसंग घडवतात.

Tennis Star Karolina Muchova Crying : खेळाच्या मैदानावर रोज काही ना काही घडतंच. खेळाडू कधी अप्रतिम कामगिरी करून दाखवतात, तर कधी अनपेक्षित प्रसंग घडवतात. शेवटी खेळाडू सुद्धा आपल्यासारखेच माणसं आहेत. त्यामुळे विजय-पराजयानंतर अनेकदा ते स्वतःच्या भावना आवरू शकत नाहीत. पण यावेळी प्रसंग थोडा वेगळाच घडला आहे. सध्या सुरू असलेल्या यूएस ओपनमध्ये एका खेळाडूला सामन्याच्या मध्यावरच डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मात्र यामागचं कारण खरंच अनोखं होतं.
Karolina Muchova saw her ex in the stands and immediately served tears instead of aces 😭🎾 Proof that heartbreak is the only opponent love can’t beat 💔😂 pic.twitter.com/V3UYcG8P5S
— Lordren (@ChigozirimChim1) September 2, 2025
प्रेक्षकांमध्ये एक्स बॉयफ्रेंड दिसताच महिला खेळाडू थबकली
यूएस ओपनमध्ये एक अनोखा प्रसंग घडला. चेक प्रजासत्ताकची स्टार खेळाडू कॅरोलिना मुचोव्हा दुसऱ्या फेरीत सोराना क्रिस्टियाविरुद्ध खेळत असताना अचानक भावुक झाली. 1-4 ने पिछाडीवर असतानाच तिने खेळ थांबवला, प्रेक्षकांकडे इशारा केला आणि डोळ्यातले अश्रू पुसले. नंतर तिने सांगितले की, कोर्टच्या अगदी जवळ तिचा एक्स बॉयफ्रेंड बसला असल्याने ती अस्वस्थ झाली होती.
या प्रसंगानंतरही मुचोव्हाने जबरदस्त पुनरागमन केले आणि सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर तिने लिंडा नोस्कोव्हा आणि मार्ता कोस्त्युक यांच्यावरही विजय मिळवला. आता तिची लढत माजी विजेती नाओमी ओसाका हिच्याशी होणार आहे.
Tennis Player Karolina Muchova broke down in tears after spotting her ex-boyfriend in the crowd during a match pic.twitter.com/MNkyqayPRg
— Instablog9ja (@instablog9ja) September 2, 2025
सामन्यानंतर केला खुलासा
त्या क्षणी मुचोव्हा का भावुक झाली होती हे कुणालाच समजले नव्हते. मात्र सामना संपल्यानंतर तिने स्वतः यामागचे कारण सांगितले. ती म्हणाली, "हे टेनिसशी संबंधित नव्हते. माझ्या बेंचच्या समोर माझा एक्स बॉयफ्रेंड बसला होता. तो अनेकदा अशा ठिकाणी येतो, जिथे त्याला येऊ नये. त्यामुळे मी थोडी घाबरले. मी त्याला निघून जाण्यास सांगितले. तो आधी गेला नाही, पण नंतर तिथून निघून गेला. त्या क्षणी माझ्यासाठी लक्ष केंद्रित करणे खूप कठीण झाले होते."
हे ही वाचा -





















