India Updated ODI Squad: टीम इंडियाला मोठा धक्का; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहर-मोहम्मद शामी खेळणार नाही, 'या' नवख्या खेळाडूला संधी
IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरनं वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
Deepak Chahar Withdrawn, Mohd Shami Ruled Out: टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर असून, टी-20 मालिका (T-20 Series) संपली आहे. आता टीम इंडिया वनडे आणि नंतर कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरनं (Deepak Chahar) वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेचं आव्हान पार करणं टीम इंडियाला तसं अवघड जाणार आहे.
बीसीसीआयनं ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. बीसीसीआयनं म्हटलं आहे की, चहरनं बीसीसीआयला फॅमिली मेडिकल एमर्जन्सीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेत आहे. त्यामुळे दीपक चहरच्या जागी आकाश दीपचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) December 16, 2023
Deepak Chahar withdrawn from the ODI series; Mohd. Shami ruled out of the Test series.
Details 🔽 #TeamIndia | #SAvIND https://t.co/WV86L6Cnmt pic.twitter.com/oGdSJk9KLK
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 24 बळी घेणारा मोहम्मद शामीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाही. मोहम्मद शामी दुखापतीनं त्रस्त आहे, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. बीसीसीआयच्या मेडिकल टीमनं मोहम्मद शामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकातील हा स्टार गोलंदाज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता मोहम्मद शामीऐवजी 17 डिसेंबरला होणाऱ्या जोहान्सबर्गमधील वनडे मालिका संपल्यानंतर श्रेयस अय्यर कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात सहभागी होईल.
राहुल द्रविड यांच्याऐवजी सितांशु कोटक यांच्यावर जबाबदारी
टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड, फलंदाजी कोच विक्रम राठोड, गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे आणि फिल्डिंग कोच टी. दिलीप टेस्ट टीमसोबत जोडले जातील. तसेच, ते इंटर-स्क्वाड गेम आणि कसोटी सामन्यांसाठी खेळाडूंच्या प्रॅक्टिसवर लक्ष देतील. टीम इंडियाला वनडे सामन्यांसाठी एक नवीन प्रशिक्षक मार्गदर्शन करतील. यात भारत अ संघाच्या कोचिंग स्टाफचा समावेश आहे, ज्यात फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, आकाश दीप