Bhuvneshwar Kumar : 'स्विंग चा किंग' भुवनेश्वर कुमारची कारकीर्द संपली? BCCIच्या 'या' स्पर्धेतही मिळाली नाही संधी
सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
Bhuvneshwar Kumar UP Ranji Trophy : सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघापासून दूर आहे. त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी दिली जात नाही. मात्र, आता भुवनेश्वर कुमारकडे टीम इंडियासह उत्तर प्रदेश संघानेही दुर्लक्ष केले आहे. आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी त्याला यूपी संघात स्थान मिळालेले नाही. त्याने अलीकडेच यूपी टी-20 लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली. तर आयपीएलमध्येही तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
भुवनेश्वर कुमारला नाही संधी मिळाली
गेल्या मोसमात रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त भुवीने विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यूपीसाठी भाग घेतला होता. मात्र या खेळाडूकडे यंदा यूपी क्रिकेट असोसिएशनने दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या जागी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्येही भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली नाही. भुवीने 2013 ते 2018 पर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी सतत क्रिकेट खेळले आहे. मात्र बीसीसीआय आता या खेळाडूकडे दुर्लक्ष करत आहे. 2018 मध्ये भुवीने भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती. 2022 मध्ये तो एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळला.
अशी देशांतर्गत कारकीर्द
आतापर्यंत त्याने 72 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 128 बळी घेतले आहेत, तर 173 लिस्ट ए सामन्यांमध्ये 170 बळी घेतले आहेत. या खेळाडूने 286 टी-20 सामन्यात 470 विकेट्स घेतल्या आहेत.
रणजी ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेशचा संघ :
आर्यन जुयाल, स्वस्तिक चिकारा, प्रियम गर्ग, अक्षदीप नाथ, नितीश राणा, सौरभ कुमार, अंकित राजपूत, आकिब खान, विपराज निगम, यश दयाल, शिवम शर्मा, सिद्धार्थ यादव, माधव कौशिक, विजय शर्मा, क्रिगरट सिंग
स्टँडबाय : अटल बिहारी राय, प्रिन्स यादव, अभिषेक गोस्वामी, विनीत पनवार, वैभव चौधरी, कार्तिकेय जैस्वाल.
हे ही वाचा -
इशान किशनचा उतरला माज! टीम इंडियात येण्यासाठी असेल आता शेवटची संधी; 'या' संघाचे करणार नेतृत्व