एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाची मदार 'या' 5 खेळाडूंवर; वाचा संपूर्ण यादी
Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा आणि मालिकेतील अंतिम टी20 सामना खेळवला जाणार असून हा जिंकणं दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
India vs South Africa, T20 : आज राजकोटच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकल्यानंतर नंतरचे दोन सामने भारताने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणं भारताला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर भारतीय संघाचा विचार करता नेमकं कोणत्या 5 खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल ते पाहूया...
- ईशान किशन : भारताकडून पहिल्या तीन सामन्यात दमदार कामगिरी कऱणाऱ्या ईशानने दोन अर्धशतकंही लगावली आहेत. चौथ्या सामन्यात तो खास कामगिरी करु शकला नसला तरी त्याने 27 धावा केल्या. भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक धावा त्यानेच केल्या असल्याने आजही त्याच्यावर सर्वांची नजर असेल. एक चांगली सुरुवात त्याच्याकडून अपेक्षित असेल.
- ऋतुराज गायकवाड : भारताचा आणखी एक युवा खेळाडू ज्याच्याकडे अनेकांचे लक्ष असेल तो म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड. पहिले दोन सामने खास कामगिरी न केलेल्या ऋतुने तिसऱ्या सामन्यात मात्र अर्धशतक लगावत भारताच्या विजयात मोलाची भागिदारी दिली. चौथ्या सामन्यात तो फेल झाला असला तरी आज सलामीला त्याच्याकडून चांगली अपेक्षा असेल.
- हार्दिक पांड्या : आयपीएल 2022 स्पर्धेत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हार्दिकच्या नेतृत्तवाखालीच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चषक जिंकला असून त्यानंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी हार्दिकची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. आथा तीन सामन्यातही त्याने चांगली कामगरी केली. चौथ्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण 46 धावा केल्या ज्यामुळे आजही त्याच्यावर अनेकांच्या नजरा असतील.
- युजवेंद्र चहल : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या चहलने या मालिकेतही नावाला साजेशी कामगिरी केली आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही मिळवला होता. चौथ्या सामन्यातही त्याने महत्त्वाच्या दोन विकेट्स घेतल्याने आजही त्याच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे.
- दिनेश कार्तिक : सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी फलंदाज म्हणजे दिनेश कार्तिक. चौथ्या सामन्यात कारकिर्दीतील पहिलं टी20 अर्धशतक दिनेशने झळकावलं. त्यामुळे आज त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल अशी शक्यता सर्वचजण वर्तवत आहेत.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement