IND vs NZ: मुंबईकर पृथ्वी शॉची टीम इंडियात निवड, दीड वर्षानंतर पुनरागमन
Prithvi Shaw Latest News Update: देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढणाऱ्या पृथ्वी शॉला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.
Prithvi Shaw Latest News Update: देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढणाऱ्या पृथ्वी शॉला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी पृथ्वी शॉला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयनं आज टीम इंडियाची निवड केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाची निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ याच्याशिवाय जितेश शर्मा यालाही टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.
रणजी चषकात आसामविरोधात पृथ्वी शॉनं वादळी खेळी केली होती. पृथ्वी शॉनं या सामन्यात 379 धावांचा पाऊस पाडला होता. याआधीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ याने छाप पाडली होती. पृथ्वी शॉ तब्बल 537 दिवसांनी भारतीय संघात परतला आहे. मात्र सध्याच्या टी 20 संघातील सलामीवीर पाहिले तर पृथ्वी शॉला न्यूझीलंड दौऱ्यावर प्लेईंग 11 मध्ये संधी मिळेल याची शाश्वती नाही
🚨 NEWS 🚨: India’s squads for Mastercard New Zealand tour of India and first two Test matches against Australia announced#TeamIndia | #INDvNZ | #INDvAUS | @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 13, 2023
जुलै 2021 पासून पृथ्वी शॉ भारतीय संघाबाहेर होता. जवळपास दीड वर्षानंतर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळाली आहे. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळला. पृथ्वीने भारतासाठी 6 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळले आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीने नऊ डावात 181.42 च्या स्ट्राइक रेटने 332 धावा चोपल्या होत्या. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाज पृथ्वी दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याशिवाय विजय हजारे चषकातही पृथ्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. विजय हजारे चषकात पृथ्वीने सात डावात 217 धावांचा पाऊस पाडला होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये पृथ्वीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
न्यूझीलंडविरोधात टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - India’s squad for NZ T20Is:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
आणखी वाचा:
IND vs NZ: टी20 मध्ये हार्दिक पुन्हा कर्णधार, रोहित-विराटला स्थान नाही, पृथ्वी शॉला संधी
ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार-इशानला संधी, जाडेजाचं पुनरागमन