IND vs NZ: टी20 मध्ये हार्दिक पुन्हा कर्णधार, रोहित-विराटला स्थान नाही, पृथ्वी शॉला संधी
Team India for New Zealand T20 Series: न्यूझीलंडविरोधात मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 सामन्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
Team India for New Zealand T20 Series: न्यूझीलंडविरोधात मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 सामन्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं पुन्हा एकदा युवा हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांना टी 20 मध्ये संधी देण्यात आलेली नाही. महत्वाचं म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुफान फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आले आहे.
29 वर्षीय विकेटकिपर फलंदाज जितेश शर्मा याला न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. याआधी श्रीलंकाविरोधात संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर जितेशला संधी देण्यात आली होती. पण अद्याप जितेश शर्माला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेलं नाही.
बीसीसीआयने टी20 सोबत एकदिवसीय संघाचीही घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्मा कर्णधार आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार आहे. शार्दुल ठाकूर आणि शाहबाज अहमद यांना एकदिवसीय संघात स्थान दिलेय. त्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मा यांनाही स्थान देण्यात आलेय.
न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ (India’s squad for NZ ODIs)-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
न्यूझीलंडविरोधात टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - India’s squad for NZ T20Is:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
केएल राहुल आणि अक्षर पटेल न्यूझिलंडविरोधात मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी उपलब्ध नसतील. घरगुती कारणामुळे दोघांनीही क्रिकेटपासून सुट्टी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. पण तो फिटनेस टेस्ट पास केली तरच संघाचा भाग असेल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलेय.
India’s squad for NZ ODIs:
— BCCI (@BCCI) January 13, 2023
Rohit Sharma (C), Shubman Gill, Ishan Kishan, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KS Bharat (wk), Hardik Pandya (vc), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umran Malik
झीलंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 जानेवारी 2023 | हैदराबाद |
दुसरा एकदिवसीय सामना | 21 जानेवारी 2023 | रायपूर |
तिसरा एकदिवसीय सामना | 24 जानेवारी 2023 | इंदूर |
पहिला टी-20 सामना | 27 जानेवारी 2023 | रांची |
दुसरा टी-20 सामना | 29 जानेवारी 2023 | लखनौ |
तिसरा टी-20 सामना | 01 फेब्रुवारी 2023 | अहमदाबाद |