IND vs ZIM : यशस्वी जयस्वालच्या वादळी खेळीची कमाल, सिकंदर रझाची चूक, एका बॉलमध्ये भारतानं पाकिस्तानचं रेकॉर्ड मोडलं, पाहा व्हिडीओ
IND vs ZIM : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाचवी टी 20 मॅच सुरु आहे. भारतानं झिम्बॉब्वे पुढं विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे (IND vs ZIM) यांच्यातील टी 20 मालिकेतील अखेरची मॅच सुरु आहे. झिम्बॉब्वेनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 20 ओव्हरमध्ये झिम्बॉब्वे विरुद्ध 6 विकेटवर 167 धावा केल्या. भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल या दोघांनी केली. सिकंदर रझानं झिम्बॉब्वेच्या डावाची पहिली ओव्हर टाकली. याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालच्या खेळीमुळं भारतानं (India) पाकिस्तानच्या (Pakistan) नावावर असलेलं एक रेकॉर्ड मोडलं. भारतानं डावाच्या पहिल्याच बॉलवर 13 धावा केल्या. यापूर्वी पाकिस्ताननं पहिल्या बॉलवर 10 धावा केल्या होत्या.
सिकंदर रझानं झिम्बॉब्वेच्या डावाची पहिली ओव्हर टाकली. सिकंदर रझानं पहिला बॉल नो टाकला. या बॉलवर यशस्वी जयस्वालनं षटकार मारला. भारताला नो बॉलची एक रन मिळाल्यानं 7 धावा झाल्या. दुसरा बॉल फ्री हिट मिळाल्यानं यशस्वी जयस्वालनं षटकार मारला. यामुळं भारताच्या नावावर 1 बॉलवर 13 धावा झाल्या. यशस्वी जयस्वालचे दोन षटकार आणि सिकंदर रझाची एक चूक याच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानच्या नावावर या पूर्वी पहिल्या बॉलवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. पाकिस्तानच्या एका बॉलवर 10 धावा होत्या.
पाकिस्ताननं यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध 2022 मध्ये पहिल्या बॉलवर 10 धावा केल्या होत्या. तर, न्यूझीलंडनं पहिल्या बॉलवर पाकिस्तान विरुद्ध 9 धावा केल्या होत्या. नेपाळनं देखील भूतानच्या विरुद्ध 9 धावा केल्या होत्या.
यशस्वी जयस्वालनं डावाची सुरुवात आक्रमक केली होती. सलग दोन षटकार मारल्यानंतर सिकंदर रझाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यशस्वी बाद झाला. यशस्वीनं 53 बॉलमध्ये 93 धावांची खेळी चौथ्या मॅचमध्ये केली होती.
Yashasvi Jaiswal became the first batter in history to score 13 runs on the 1st ball of a T20i. 🌟pic.twitter.com/98j63xmtGu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 14, 2024
भारताची मालिकेत विजयी आघाडी
भारताच्या झिम्बॉब्वे दौऱ्याची सुरुवात पहिलाच्या मॅचमधील पराभवानं झाली होती. भारताला पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं सलग तीन मॅच जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. आजची मॅच देखील जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरलेली आहे.
झिम्बॉब्वेला विजयासाठी 168 धावांची गरज
भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेटमध्ये 167 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव संजू सॅमसन आणि रियान परागनं सावरला. संजू सॅमसननं 58 तर रियान परागनं 22 धावा केल्या. यानंतर,शिवम दुबेनं 26 धावा केल्या. या धावांच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 167 धावा केल्या. झिम्बॉब्वेला विजयासाठी 168 धावांची गरज आहे.
संबंधित बातम्या :