T20 World Cup 2024 USA vs WI: अमेरिकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या धमाकेदार विजयाने इंग्लंडला धक्का; 'ग्रुप बी'च्या गुणतालिकेत काँटे की टक्कर
T20 World Cup 2024 USA vs WI: अमेरिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाने 10.5 षटकांत सामना संपवला.
T20 World Cup 2024 USA vs WI: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेचा (United States vs West Indies) 9 विकेट्सने पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात शाई होपच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 10.5 षटकांत सामना जिंकला. होपने 39 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. निकोलस पुरनने दमदार कामगिरी केली. यापूर्वी रोस्टन चेस आणि आंद्रे रसेलची गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली होती. अमेरिकेकडून अँड्रियास गॉसने 29 धावांची खेळी खेळली.
अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकांत सर्वबाद 128 धावा केल्या. यादरम्यान गौसने 16 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. नितीश कुमारने 19 चेंडूत 20 धावा केल्या. कर्णधार ॲरॉन जोन्स 11 धावा करून बाद झाला. यूएसएच्या डावात वेस्ट इंडिजकडून रसेलने 3 विकेट्स घेतल्या. तर अल्झारी जोसेफने 4 षटकात 31 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. रोस्टन चेसने 4 षटकांत 19 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या.
शाई होपची तुफान फटकेबाजी-
अमेरिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाने 10.5 षटकांत सामना संपवला. होप आणि जॉन्सन चार्ल्स सलामीला आले होते. यादरम्यान चार्ल्स 15 धावा करून बाद झाला. हरमीत सिंगने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चार्ल्सने 39 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 षटकार आणि 4 चौकार मारले. निकोलस पुरनने नाबाद 27 धावा केल्या. त्याने 12 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
वेस्ट इंडिजला गुणतालिकेत फायदा झाला -
सुपर 8 च्या ग्रुप 2 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिका अव्वल आहे. त्याने 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. त्याचे 4 गुण आहेत. वेस्ट इंडिजने 2 सामने खेळले आणि 1 जिंकला. त्याचे 2 गुण आहेत. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचेही 2 गुण आहेत. पण वेस्ट इंडिजचा नेट रन रेट चांगला आहे.
आज भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना-
टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज सुपर 8 फेरीत भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सामना रंगणार आहे. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आज भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.