T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे.
T20 World Cup 2024 Winner Prize Money: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024)नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी-20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
The unstoppable forces meet 🇿🇦🇮🇳
— ICC (@ICC) June 28, 2024
Aiden Markram 🆚 Rohit Sharma – who will lift the #T20WorldCup trophy? 🤔 pic.twitter.com/hlR4hasBIp
दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास-
भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा पराभव केला. आता अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. आयर्लंडसह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तान, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केले आहे.
T20 विश्वचषकात कोणत्या संघाचा वरचष्मा आहे?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 26 वेळा T20 फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 14 वेळा पराभूत केले आहे, तर 11 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोनवेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे, परंतु अंतिम फेरीत काय होते हे पाहणे मनोरंजक असेल.
विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल-
टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षिसांची रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.
सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे?
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 3.32 कोटी रुपये मिळतील. तर सुपर-12 टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांमध्ये 5.85 कोटी रुपये वितरित केले जातील. म्हणजेच ही रक्कम सर्व संघांमध्ये विभागली जाईल.