T20 World Cup 2024 Saurabh Netravalkar: केशवा माधवा, मन उधाण वाऱ्याचे ते राधा ही बावरीपर्यंत; अमेरिकेचा वेगवान गोलंदाज मराठी गाणं गातो तेव्हा..., Video
T20 World Cup 2024 Saurabh Netravalkar: अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे.
T20 World Cup 2024 Saurabh Netravalkar: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून Super 8 मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. विराट कोहली (Virat Kohli) व रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला पराभूत केले. (India vs USA)
भारत आणि अमेरिकेच्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची (Saurabh Netravalkar) गोलंदाजी लक्षात राहिली. अर्शदीप सिंगनं अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. तर, सौरभ नेत्रावळकरनं भेदक मारा करत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केलं. अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केलं होतं, तेव्हा सौरभ नेत्रावळकरने विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यापासूनच सौरभ नेत्रावळकर चर्चेत आला आहे.
सौरभ नेत्रावळकरचे व्हिडीओ व्हायरल-
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. तसेच सौरभ हा मराठमोळा क्रिकेटपटू आहे. रणजीत त्याने मुंबई संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न घेऊन सौरभ अमेरिकेत स्थायिक झाला. मात्र यानंतरी त्याचं मराठीवरचं प्रेम कमी झालेलं नाही. सौरभने मराठी गाणं गातानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये केशवा माधवा...मन उधाण वाऱ्याचे, राधा ही बावरी या मराठी गाण्यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न घेऊन तो अमेरिकेत स्थायिक झाला. यानंतरही नेत्रावळकराने आपले क्रिकेट टॅलेंट दाखवले. नेत्रावळकरने अमेरिकेत आपला क्रिकेट जोपासत अमेरिकेच्या संघात मजल मारली. विशेष म्हणजे यापूर्वी तो भारतीय संघासाठी अंडर-19 चा विश्वचषक खेळला आहे. त्याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारताचा अमेरिकेविरुद्ध विजय?
अमेरिकेने भारतापुढे (USA vs IND) विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेटनं विजय मिळवला. भारताने या विजयासह भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केलं. सूर्यकुमार यादवनं 50 धावा केल्या. तर, शिवम दुबे यानं देखील त्याला 31 धावा करत साथ दिली. रिषभ पंतनं 18 धावा केल्या.