IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
T20 World Cup 2024 IND vs PAK : आयपीएलच्या रनसंग्रामानंतर (IPL 2024) टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. याची उस्तुक्ता सर्व क्रीडाप्रेमींना लागली आहे.
T20 World Cup 2024 IND vs PAK : आयपीएलच्या रनसंग्रामानंतर (IPL 2024) टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. याची उस्तुक्ता सर्व क्रीडाप्रेमींना लागली आहे. एक जूनपासून टी20 विश्वचषकाला (T 20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. या विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान ( India Vs Pakistan) यांच्यातील सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेय. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या लढतीचं खास पोस्टर आयसीसीकडून जारी करण्यात आलेय. भारत पाकिस्तान सामन्याचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय. त्या पोस्टरवर शुभमन गिल (Shubman Gill) आणि शाहीन आफ्रिदी यांचा फोटो वापरण्यात आलाय. हा फोटो आयसीसीकडून जारी केल्याचा दावा करण्यात येत आहे. आयीसीच्या टी 20 वर्ल्डकपच्या ट्वीटवर पेजवर असा कोणताही फोटो दिसून येत नाही. पण सध्या या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेय. आयसीसीने याआधी जारी केलेल्या पोस्टरवर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फोटोचा वापर केला होता. पण व्हायरल होणाऱ्या पोस्टरवर विराट-रोहित गायब असल्याचे दिसतेय. त्यावर आता शुभमन गिल याचा फोटो दिसत आहे. त्याशिवाय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याचाही फोटो दिसत आहे.
Shubman Gill featuring in India Vs Pakistan poster of ICC. 🔥 pic.twitter.com/oFk6HQfbr8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 19, 2024
टीम इंडियाची लवकरच निवड -
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची लवकरच निवड करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, काही खेळाडूंची नावं निश्चित झाल्याचं समोर आले होते. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही समावेश होता. रवींद्र जाडेजा यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, त्याशिवाय मोहम्मद सिराज याच्यावरही विश्वास दाखवला जाऊ शकतो. सिराज सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, पण अनुभव पाहता सिराजला स्थान मिळू शकते. विराट कोहली याचेही नाव निश्चित झाल्याचं समोर येत आहे.
भारतीय संघाचे कुणासोबत सामने ?
दरम्यान, टी 20 विश्वचषकाचा रनसंग्राम यंदा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होणार आहे. टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये तीन सामने खेळणार आहे. पहिला सामना आयर्लंडसोबत होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानसोबत भिडणार आहे. 12 जून रोजी भारत आणि यूएसए यांच्यात सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमध्ये हेणार आहे. इंडिया आणि कॅनडा यांच्यातील सामना फ्लोरीडामध्ये 12 जून रोजी पार पडणार आहे.