एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: भारतीय संघात दोन बदल होणार?; खेळपट्टी, नाणेफेक, Playing XI, हेड टू हेड...; पाहा A टू Z माहिती

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: बार्बाडोसमधील केन्सिग्टन ओव्हल, ब्रिजटाउन स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत आठ सामने खेळले गेले.

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024)स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरु होईल. टीम इंडियाला जवळपास 11 वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. शिवम दुबे व विराट कोहली यांचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंताजनक आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आता बदल करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात देखील टीम इंडिया कोणतेही बदल न करता मैदानात उतरेल.

कशी असेल खेळपट्टी?

बार्बाडोसमधील केन्सिग्टन ओव्हल, ब्रिजटाउन स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत आठ सामने खेळले गेले. खेळपट्टी गोलंदाज तसेच फलंदाजासाठी उपयुक्त आहे. या मैदानावर भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. येथे मोठी धावसंख्या उभारता येते, पण धावांचा पाठलाग करणे सोपे नाही, अंतिम सामन्यात 175 पेक्षा जास्त धावा पुरेशा ठरतील. बार्बाडोसमध्ये आतापर्यंत 32 टी-20 सामने झाले. प्रथम फलंदाजी करणारा संघ 19 वेळा जिंकला.

दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास-

भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा पराभव केला. आता अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. आयर्लंडसह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तान, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केले आहे.

T20 विश्वचषकात कोणत्या संघाचा वरचष्मा आहे? 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 26 वेळा T20 फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 14 वेळा पराभूत केले आहे, तर 11 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोनवेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे, परंतु अंतिम फेरीत काय होते हे पाहणे मनोरंजक असेल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: रोहित शर्मा-विराट कोहलीला BCCI कडून पुन्हा संधी नाही?; आज अखेरचा टी-20 सामना ठरण्याची शक्यता

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: राखीव दिवसापासून 'सुपर ओव्हर'पर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास आयसीसीचे नियम काय?

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धारEknath Shinde On BMC Election  : प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार,एकनाथ शिंदेंचा बीएमसीसाठी निर्धारSpecial Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
Embed widget