एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs Pak: अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह नव्हे...हार्दिक पांड्याने घेतलेली ती विकेट ठरली 'Game Changing Moment'

T20 World Cup 2024 Ind vs Pak: पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या.

T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. यासह टी-20 विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले.

सामना कुठे फिरला?

पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या, तर आठ विकेट्स पाकिस्तानच्या हातात होत्या. पण यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा सामना 6 धावांनी हरला. हार्दिक पांड्या भारताकडून 13 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात हार्दिक पांड्याने महत्त्वाची विकेट घेतली ती म्हणजे फखार जमानची. फखार जमानच्या विकेट्सने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. फखार जमान टी-20 मधील महत्वाचा फलंदाज होता. तसेच फखारने भारताविरुद्ध याआधी देखील चांगल्या धावा केल्या  आहेत. पण हार्दिकने फखारची घेतलेली विकेट सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला. 

पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव-

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.

विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आमच्या डावात आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र आम्ही पुरेशी भागीदारी केली नाही आणि फलंदाजीत कमी पडलो. गेल्या सामन्याच्या तुलनेत चांगली विकेट होती. आम्ही जेव्हा फलंदाजी करुन गोलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या विकेट्स जाऊ शकतात, तर त्यांच्या पण विकेट्स आपण घेऊ शकतो. प्रत्येकाकडून थोडेसे योगदान मोठे फरक करू शकते. बुमराह एक ताकदवान खेळाडू आहे. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. संपूर्ण विश्वचषकामध्ये त्याने त्या मानसिकतेत राहावे, असं रोहित शर्मा म्हणाला. तसेच मैदानात गर्दी देखील चांगली होती. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं रोहित शर्माने सांगितले. 

संबंधित बातम्या:

बुमाराहने मॅच कुठे फिरवली, कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार

T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र

T20 World Cup 2024 Ind vs Pak: 12 चेंडूत 21 धावा...जसप्रीत बुमराह अन् अर्शदीप सिंगचा भेदक मारा; शेवटच्या षटकाचा थरार, Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Ind vs Eng 1st ODI : इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?
127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget