एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs Pak: 12 चेंडूत 21 धावा...जसप्रीत बुमराह अन् अर्शदीप सिंगचा भेदक मारा; शेवटच्या षटकाचा थरार, Video

T20 World Cup 2024 Ind vs Pak: भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारताने पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले.

T20 World Cup 2024 Ind vs Pak: कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने शानदार खेळ करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 धावांनी नमवले. (T20 World Cup 2024) यासह टी-20 विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारताने पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 31 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. पाकिस्तान जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला तेव्हा बाबर आझम फक्त 13 धावा करून लवकर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानने 44 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.

शेवटच्या दोन षटकांत थरार-

पाकिस्तानला विजयासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. जसप्रीत बुमराहने 19 वे आणि अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले. 19 व्या षटकांत बुमराहने एक विकेट्स घेत फक्त 3 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीपने पहिल्याच चेंडूत इमाद वसीमला बाद केले. यानंतर नसीम शाहने आक्रमक फटकेबाजी करत दोन चौकार लगावले, पण अर्शदीपच्या भेदक माऱ्यासमोर तोही अपयशी ठरला. अर्शदीपने 20 व्या षटकांत 11 धावा देत एक विकेट्स घेतली. 

पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.

विराट कोहली पहिल्यांदाच ठरला अपयशी 

याआधी विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 डावांमध्ये कोहलीने आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत. ज्या डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही त्यातही तो 36 धावांवर नाबाद राहिला. पण 2024 च्या टी-20 विश्वचषकात तो केवळ 4 धावा करून बाद झाला होता. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.

संबंधित बातमी:

T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND A vs SL A : वैभव सूर्यवंशीच्या खेळण्यावर बंदी? श्रीलंकेत जे घडलं त्यामुळे BCCI टेन्शनमध्ये; आयसीसी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; जाणून घ्या नियम काय सांगतो?
वैभव सूर्यवंशीच्या खेळण्यावर बंदी? श्रीलंकेत जे घडलं त्यामुळे BCCI टेन्शनमध्ये; आयसीसी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; जाणून घ्या नियम काय सांगतो?
Vaibhav Sooryavanshi : मैदानात धक्काबुक्की, शिवीगाळ... पण बाहेर येताच वैभव सूर्यवंशीने कुणाचे पाय धरले? कोणीच न पाहिलेला Video समोर, नेमकं काय घडलं?
मैदानात धक्काबुक्की, शिवीगाळ... पण बाहेर येताच वैभव सूर्यवंशीने कुणाचे पाय धरले? कोणीच न पाहिलेला Video समोर, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : अंधार पडला, अंपायरने निर्णय बदलला... अन् वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला! मग भारत-श्रीलंका मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिकेट जग हादरलं, पाहा Video
अंधार पडला, अंपायरने निर्णय बदलला... अन् वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला! मग भारत-श्रीलंका मॅचमध्ये जे झालं त्याने क्रिकेट जग हादरलं, पाहा Video
IND A Vs SL A : भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video
भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
Embed widget