USA vs IND: पाकिस्तानचा सुपर-8 चा प्रवेश भारताच्या हाती, टीम इंडियाच्या विजयानं पाकचं गणित सोपं होणार
IND vs USA T20 World Cup 2024: टीम इंडिया आणि अमेरिका आज टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार आहेत. भारतानं आतापर्यंत पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
न्यूयॉर्क: भारत आणि अमेरिका (IND vs USA) आज टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये आमने सामने येणार आहेत. आज टी20 वर्ल्ड कपमधील 25 वी मॅच असेल. भारत अ गटात पहिल्या स्थानावर आहे. आजची मॅच जिंकल्यास भारतीय संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. भारताच्या विजयाकडे पाकिस्तानची (Pakistan) टीम लक्ष ठेवून आहे. भारतानं अमेरिकेवर विजय मिळवल्यास त्याचा फायदा पाकिस्तानला होणार आहे. भारताच्या विजयामुळं अमेरिकेचं नेट रनरेट खराब होईल. याचा फायदा पाकिस्तानच्या संघाला होऊ शकतो.
भारत अ गटात गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत दोन मॅच खेळल्या असून त्या जिंकल्या आहेत. भारताकडे 4 गुण असून नेट रन रेट +1.455 इतकं आहे. अमेरिका दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी देखील चार गुण मिळवले आहेत. त्यांचं नेट रन रेट +0.626 इतकं आहे. पाकिस्तान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून त्यांचा दोन मॅचमध्ये पराभव झाला असून एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तानकडे 2 गुण आहेत. त्यांचं नेट रनरेट +0.191 इतकं आहे.
भारताच्या विजयावर पाकिस्तानचं भविष्य
भारताविरुद्ध अमेरिकेचा पराभव झाल्यास पाकिस्तानच्या सुपर 8 मध्ये प्रवेशाच्या आशा कायम राहतील. पाकिस्तानची आता एकच मॅच शिल्लक आहे. पाकिस्तान आणि आयरलँड यांच्यातील मॅच 16 जून रोजी होणार आहे. भारताचा अमेरिकेकडून पराभव झाल्यास पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळं पाकिस्तानच्या संघाला भारतानं अमेरिकेला पराभूत करावं, अशी अपेक्षा ठेवावी लागत आहे.
आस्ट्रेलियानं ब गटातून सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं आहे. ऑस्ट्रेलियानं तीन मॅच खेळल्या असून त्यांनी सर्व मॅच जिंकल्या आहेत. ब गटातील नामिबिया स्पर्धेबाहेर गेलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं ड गटातून क्वालिफाय केलं केलं आहे. त्यांनी देखील तीन मॅच जिंकल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये भारतानं विजय मिळवल्यास सुपर 8 मध्ये प्रवेश मिळू शकतो.
संबंधित बातम्या :
MPL: महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पाचा ईगल नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय