Syed Mushtaq Ali Trophy 2022 : श्रेयस अय्यरचं दमदार अर्धशतक, विदर्भ संघाला मात देत मुंबई फायनलमध्ये
Syed Mushtaq Ali Trophy 2022 Semifinal : श्रेयस अय्यरच्या शानदार फलंदाजीच्या आणि शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली टी20 टूर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक घेतली आहे.
MUM vs VID, Syed Mushtaq Ali Trophy 2022 : भारताच्या डॉमेस्टीक क्रिकटमधील एक महत्त्वाची आणि मानाची स्पर्धा म्हणजे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) दरम्यान यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघानं दमदार कामगिरी करत फायनलपर्यंत धडक घेतली आहे. विदर्भ संघाविरुद्ध (MUM vs VID) झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) अप्रतिम अशी 73 धावांची खेळी केल्यामुळे मुंबईनं 5 विकेट्सने विजय मिळवला. अय्यरसह मुंबईच्या शम्स मुलानीने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या विजयात मोलाची भर घातली. प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने 164 धावा केल्या, ज्यानंतर मुंबईनं 16.5 षटकातंच ही धावसंख्या गाठत 5 विकेट्सनी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना हिमाचल प्रदेशशी होणार आहे, ज्यांनी पंजाबला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Into the final we go 💪 Always fun playing at Eden Gardens pic.twitter.com/1WqlrbmB6T
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) November 3, 2022
नाणेफेक जिंकून विदर्भ संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर त्यांची सुरुवात खास झाली नाही. 28 धावांवर त्यांचे दोन गडी बाद झाले होते. ज्यानंतर मधल्या फळीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण 12 षटकांत 95 धावांत निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर जितेश शर्माने 24 चेंडूत नाबाद 46 धावांची धडाकेबाज खेळी करत विदर्भाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. जितेशने या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. मुंबईकडून शम्स मुलानीने चार षटकात केवळ 20 धावा देत सर्वाधिक तीन बळी घेतले.
165 या धावसंख्येचा पाठलाग करताना 31 धावांत दोन गडी गमावल्याने मुंबईचीही सुरुवात खास झाली नव्हती. मात्र, यानंतर पृथ्वी शॉ (34) याने अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करून डावाची धुरा सांभाळली. शॉ बाद झाल्यानंतर अय्यरने सरफराज खानसोबत चौथ्या विकेटसाठी 71 धावांची मोठी भागीदारी रचली. अय्यर 44 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर 16व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. पण तोवर त्याने सामना मुंबईला जिंकवून देत आणला होता, ज्यामुळे काही 16.5 षटकांत मुंबईने सामना 19 चेंडू राखून जिंकला.
हे देखील वाचा-