(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suryakumar Yadav : सूर्या दादाची संघात अचानक एन्ट्री, ब्रेकनंतर पुनरागमन, केली मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
Suryakumar Yadav to join Mumbai for SMAT : भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार मैदानात दिसला नव्हता, मात्र आता तो टी-20 स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार मंगळवारपासून मुंबई संघात सहभागी होणार असून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत भाग घेणार आहे. मंगळवारी मुंबई संघ हैदराबाद येथे सर्व्हिसेस संघाशी भिडणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची शक्यता होती, मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे पहिले चार सामने तो खेळू शकला नाही. न खेळण्यामागे वैयक्तिक कारणे देण्यात आली. त्याच्या बहिणीचे लग्न हे वैयक्तिक कारण असल्याचे नंतर उघड झाले. या लग्नामुळे सूर्यकुमार सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता.
आता बहिणीच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम उरकून सूर्यकुमार परतला आहे. गेल्या शनिवारीच तो मुंबई विमानतळावर उतरला होता आणि त्यानंतर हैदराबादला रवाना झाला होता. मुंबईचा संघ आज नागालँडविरुद्ध खेळत आहे, मात्र सूर्यकुमार या सामन्याचा भाग नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादव त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.
Suryakumar Yadav to play last two Syed Mushtaq Ali Trophy games for Mumbai…!!!!
— KAUSHIK (@cricketkaushik) December 1, 2024
Sky's magic will be seen in the last two matches🤗🤗#SMAT #SMAT2024 pic.twitter.com/EkI2ZpbVTV
केरळविरुद्ध मुंबईचा झाला पराभव
मुंबईने पहिल्या सामन्यात गोव्याचा 26 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने शतक झळकावत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. पुढच्या सामन्यात त्यांनी महाराष्ट्राचा पाच गडी राखून पराभव केला आणि या सामन्यातही श्रेयसने धमाकेदार अर्धशतक झळकावले. मात्र, त्यांना केरळविरुद्ध 43 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि या सामन्यात त्यांना सूर्यकुमारची सर्वाधिक उणीव भासेल.
प्रथम फलंदाजी करताना केरळने 234/5 अशी मोठी धावसंख्या उभारली, ज्यामध्ये सलमान निझारने नाबाद 99 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल श्रेयस आणि अजिंक्य रहाणेच्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईने चोख प्रत्युत्तर दिले, मात्र मधल्या फळीत तिसरा आक्रमक फलंदाज नसल्यामुळे त्यांना नंतर सामना गमवावा लागला.
हे ही वाचा -