Suryakumar Yadav Injury : सूर्याला लागले ग्रहण, बांगलादेश मालिकेपूर्वी जखमी; टीम इंडियाला मोठा धक्का
Suryakumar Yadav Injury : भारतीय क्रिकेट संघाचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेदरम्यान जखमी झाला. सूर्याची दुखापत टीम इंडियासाठी मोठा धक्का असू शकते कारण....
Suryakumar Yadav Injury : भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेदरम्यान जखमी झाला. बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी ही अजिबात चांगली बातमी नाही. टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे, जी 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. क्षेत्ररक्षण करताना सूर्याला दुखापत झाली.
ESPNcricinfo मधील वृत्तानुसार, कोईम्बतूर येथे मुंबई आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन XI यांच्यातील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव जखमी झाला. या सामन्यात सूर्या केवळ 38 चेंडूतच मैदानावर राहू शकला आणि त्यानंतर तो जखमी झाला. या दुखापतीनंतर सूर्याच्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुलीप करंडक स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्या हा दुलीप ट्रॉफीमधील 'सी' संघाचा भाग आहे.
मात्र, सुर्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुन्हा कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सूर्याला श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा टी-20 कर्णधार बनवण्यात आले होते. 6 ऑक्टोबरपासून बांगलादेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी सूर्या उपलब्ध असेल की नाही याबाबत कोणतेही अपडेट मिळालेले नाही. आता तो मैदानात कधी परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
काही दिवसापूर्वी सूर्याने भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'द हिंदू'शी बोलताना सूर्या म्हणाली की, "रेड बॉल क्रिकेटला नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. जेव्हा मी मुंबईच्या मैदानात लहानाचा मोठा झालो आणि रेड बॉलवर खूप क्रिकेट खेळलो, मी 10 वर्षांहून अधिक काळ अनेक पहिल्या सामन्यांमध्ये भाग घेत आहे आणि मला अजूनही हे स्वरूप खेळायला आवडते आणि त्यामुळेच मी दुलीप ट्रॉफीच्या आधी येथे आलो आहे.
हे ही वाचा :