Suryakumar Yadav : सूर्याकडे महारेकॉर्ड करण्याची संधी, विराट-बाबरचा विक्रम निशाण्यावर
Suryakumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गुरुवारपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Suryakumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गुरुवारपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवला मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. विराट कोहली, आणि बाबर आझम यांचा विक्रम मोडण्याची नामी संधी सूर्याकडे आली आहे. विराट कोहलीला त्यासाठी 159 धावांची गरज आहे.
विराट कोहली आणि बाबर आझम यांचा रेकॉर्ड तोडणं, सूर्यासाठी सोप्प नसेल. सूर्याला पुढील सामन्यात 159 धावांची गरज आहे. सूर्याने पुढील डावात 159 धावा केल्या तर बाबर आझमचा विक्रम मोडेल. सूर्याने पुढच्या दोन डावात 159 धावा केल्या तर तो बाबर आझम आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्याशी बरोबरी करेल. खरंतर बाबर आणि रिझवानने टी-20 च्या 52 डावांमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठला होता. सूर्याने पुढील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय डावांत 159 धावा केल्या तर तो विराट कोहलीचा विक्रम मोडेल. कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी 56 डाव घेतलेत. आता सूर्या कोणत्या फलंदाजाचा विक्रम मोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आतापर्यंत, सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 50 डावांमध्ये 46.02 च्या सरासरीने आणि 172.70 च्या स्ट्राइक रेटने 1841 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 3 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका -
वनडे विश्वचषकानंतर आता भारतीय संघ टी20 साठी मैदानात उतरणार आहे. 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिके रंगणार आहे. पहिला सामना विशाखापटनम येथील राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.
पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होत असलेल्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी, भारतीय संघात फक्त दोनच खेळाडू असतील जे 2023 च्या विश्वचषकाचा भाग होते, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. प्रसिध कृष्णाने विश्वचषकातील एकही सामना खेळला नाही. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघात सामील होणार आहे. अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक कसे आहे?
- पहिला सामना- २३ नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
- दुसरा सामना- २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
- तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- चौथा सामना- ०१ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
- पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार