Suryakumar Yadav : 'सूर्या'च्या शिरपेचात मानाचा तुरा, T20I क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 चा पुरस्कार पटकावला
सूर्यकुमार यादव याने गेल्यावर्षी आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गेल्या वर्षभरात सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये एक हजार 164 धावांचा पाऊस पाडला होता.
Suryakumar Yadav ICC Men's T20I Cricketer of the Year 2022 : सूर्यकुमार यादव याने 2022 या वर्षभरात टी 20 क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. या कामगिरीच्या बळावर सूर्यकुमार यादवने टी 20 क्रमवारीत अव्वल स्थानावर झेपही घेतली आहे. आता आयसीसीनं सूर्यकुमार यादवला क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 पुरस्कारानं सन्मानित केलेय.
सूर्यकुमार यादव याने गेल्यावर्षी आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गेल्या वर्षभरात सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये एक हजार 164 धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळेच आयसीसीनं सूर्याला क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 हा पुरस्कार जाहीर केलाय. आयसीसीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. बीसीसीआयनेही ट्वीट करत सूर्यकुमार यादवला शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी सूर्यकुमारचं कौतुक केलेय.
सूर्याने 2022 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये वादळी खेळी केली. वर्षभरात एक हजार पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला होता. वर्षभरात हजार पेक्षा जास्त धावा काढणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. वर्षभरात 31 सामन्यात सूर्यानं 1164 धावा काढल्या. 187 पेक्षा जास्त स्ट्राइकने सूर्यानं वर्षभरात धावा जमवल्या आहेत. 31 सामन्यात सूर्यानं 68 षटकारांचा पाऊस पाडलाय. सूर्याकुमारच्या याच भन्नाट कामगिरीमुळे आयसीसीनं क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 म्हणून त्याची निवड केली आहे.
2022 मध्ये, सूर्यकुमार यादवनं एकूण 31 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्यात. ज्यात 2 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकातही सूर्याची कामगिरी उत्कृष्ट होती. सूर्यानं 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत 59.75 च्या सरासरीनं 239 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
Presenting the ICC Men's T20I Cricketer of the Year 2022 👀#ICCAwards
— ICC (@ICC) January 25, 2023
As @surya_14kumar becomes the ICC Men’s T20I Cricketer of the Year 2️⃣0️⃣2️⃣2️⃣, relive the best of SKY and hear his special message after receiving the award 👏🏻👏🏻
— BCCI (@BCCI) January 25, 2023
Watch 📽️https://t.co/IGRTAM8PZ6 https://t.co/6NkbPHh16F
2021 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण
मुंबईकर सूर्यकुमार यादवने 14 मार्च 2021 रोजी भारतीय संघासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या जवळपास 20 महिन्यांनंतर आता तो T20 आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. 2 नोव्हेंबर 2022 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय T20 चा नंबर वन फलंदाज होण्याचा मान मिळवला. यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच काही दिवसांपूर्वी 27 डिसेंबरला त्याला आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं.
हे देखील वाचा-