Virat Kohli : विराट कोहलीने आउट होताच उचलले ग्लव्स, रिटायरमेंट की वेगळं काहीतरी? गावसकरांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेद्वारे कोहलीने टीम इंडियाच्या जर्सीत पुनरागमन केले. पण त्याचे कमबॅक काही खास ठरले नाही.

Sunil Gavaskar on Virat Kohli : विराट कोहलीच्या वनडे पुनरागमनाची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेद्वारे कोहलीने टीम इंडियाच्या जर्सीत पुनरागमन केले. तब्बल आठ महिन्यांनंतर तो भारतासाठी खेळताना दिसला, पण त्याचे कमबॅक काही खास ठरले नाही. सलग दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. ॲडलेड वनडेत कोहली (Virat Kohli Vs Australia) बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि कोहलीनेही ग्लव्स वर उचलून प्रतिसाद दिला. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या. आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या चर्चांवर भाष्य केले आहे.
VIRAT KOHLI GONE FOR HIS SECOND DUCK OF THE SERIES!#AUSvIND | #PlayoftheDay | @BKTtires pic.twitter.com/jqIdvMeX9T
— cricket.com.au (@cricketcomau) October 23, 2025
सुनील गावसकर यांचा कोहलीवर मोठा खुलासा
एका शोदरम्यान गावसकर म्हणाले, “विराट कोहली अशी निवृत्ती घेणारा खेळाडू नाही. त्याचे लक्ष्य 2027 चा वनडे वर्ल्ड कप आहे. तो नक्कीच सिडनीत खेळेल. दोन डक झाल्यामुळे तो करिअर संपवेल असं तुम्हाला खरंच वाटतं का? अजिबात नाही. तो नेहमीप्रमाणे दमदार कामगिरी करत बाहेर पडेल. अजून खूप वनडे सामने आहेत, सिडनीनंतर साउथ आफ्रिकेविरुद्ध घरच्या मालिकाही आहेत. माझ्या मते कोहली आणि रोहित शर्मा दोघांचे पुढील मोठे ध्येय 2027 चा वर्ल्ड कप असणार आहे.”
कोहलीच्या ‘ग्लव्स इशाऱ्याबद्दल’ गावसकर काय म्हणाले?
कोहलीने आउट झाल्यानंतर प्रेक्षकांकडे हात उचलून इशारा केला होता. त्यावर गावसकर म्हणाले, “तो निवृत्तीचा इशारा नव्हता. जेव्हा तो फलंदाजीसाठी आला, तेव्हा भारतीय आणि ऑस्ट्रेलियन दोन्ही चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. विशेषतः ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी त्याला टाळ्या वाजवून सन्मान दिला आणि कोहलीने तो सन्मान स्वीकारला. जेव्हा खेळाडू परत पॅव्हेलियनकडे जातो, तेव्हा तिथे काही सदस्य असतात, म्हणजे टेस्ट किंवा फर्स्ट-क्लास क्रिकेट खेळलेले लोक. कोहलीने फक्त त्यांच्याकडे इशारा केला. त्यात काही अर्थ काढण्याची गरज नाही.”
कल से ऐसी रील और फोटो वायरल है....
— Lokendra Singh (@LSinghShekhawat) October 24, 2025
मै तो विराट कोहली को 2027 ODI वर्ल्डकप तक देखना चाहता हूं..... और आप ? pic.twitter.com/eLtYwyCyrh
हे ही वाचा -





















