Steve Smith News : WTC फायनल सामन्यात स्टीव्ह स्मिथवर आली मैदान सोडण्याची वेळ, बावुमाच्या 'त्या' शॉटवर नेमकं काय घडलं? VIDEO
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC Final 2025) चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे.

Steve Smith AUS vs SA WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC Final 2025) चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याच वेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगला सामना केला आणि चहाच्या वेळेपर्यंत 2 विकेट गमावून 94 धावा केल्या. चहाच्या वेळेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून 188 धावा दूर होता, तर ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्यासाठी 8 विकेटची आवश्यकता होती.
पण, चहाच्या वेळेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला. अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याचा झेल सोडला आणि त्याच वेळी त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे स्मिथला तातडीने मैदान सोडावं लागलं.
View this post on Instagram
स्टीव्ह स्मिथची दुखापत ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब!
स्मिथच्या अनुपस्थितीचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षणावर स्पष्टपणे दिसून आला. आधी त्याच्या जागी युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासला फील्डिंगसाठी आला, पण काही षटकांतच त्यालाही वैद्यकीय मदतीची गरज भासली आणि त्याच्या जागी मॅट कुह्नमॅनला मैदानावर उतरला आहे. त्यामुळे मैदानात त्याची जागा तात्पुरती भरून काढण्यात आली असली, तरी अशा निर्णायक क्षणी अनुभवी खेळाडूची अनुपस्थिती संघासाठी मोठं नुकसान ठरू शकते.
टेम्बा बावुमाला मिळालं जीवदान
दरम्यान, स्मिथने झेल सोडल्यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमा फक्त 2 धावांवर खेळत होता आणि त्याला जीवदान मिळालं. आता याला जीवनदान मिळाल्यानं सामन्याचं चित्र काहीसं बदलू शकतं. झेल घेतला गेला असता तर ऑस्ट्रेलियाला मोठी संधी मिळाली असती. दक्षिण आफ्रिकेने चहापानाच्या वेळेपर्यंत 2 विकेट गमावून 94 धावा केल्या होत्या. चहापानाच्या वेळेपर्यंत, टेम्बा बावुमा आणि एडेन मार्कराम क्रीजवर 49 धावा करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध खंबीरपणे उभे होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावात 212 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर गुंडाळून 74 धावांची आघाडी घेतली. त्याच वेळी, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 207 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्य अंतिम सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचे लक्ष्य दिले.
हे ही वाचा -




















