(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: जलतरणपटू श्रीहरीची यशस्वी भरारी, कॉमनवेल्थ बॅकस्ट्रोक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
Birmingham Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराजन (Srihari Nataraj) सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
Birmingham Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराजन (Srihari Nataraj) सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. परूषांच्या जलतरण 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत त्यानं अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. जलतरण स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यानं 54.55 सेकंदाची वेळ नोंदवत अंतिम फेरीत धडक दिलीय. त्यानं आपल्या हीटमध्ये चौथा आणि एकूण सातव्या स्थानावर राहून फायनलमध्ये जागा निश्चित केली. दक्षिण आफ्रिकेच्या पीटर कोएत्जेनं उपांत्य फेरीत सर्वात जलद 53.67 सेकंदात 100 मीटर अंतर गाठलं.
श्रीहरी नटराजनची चमकदार कामगिरी
श्रीहरी नटराजननं पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चमकदार कामगिरी करत 54.55 सेकंदाची वेळ नोंदवत चौथे स्थान पटकावलं. अशा प्रकारे श्रीहरी नटराजन स्पर्धेत एकूण 7 व्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. मूळचा बंगळुरूचा असलेला श्रीहरीनं 54.68 सेकंदाची वेळ नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानं त्या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावलं, तर एकूण पाचवा जलतरणपटू ठरला होता.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्लालिफिकेशन ए हीटमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय
टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्लालिफिकेशन ए हीटमध्ये भाग घेणारा नटराज हा पहिला भारतीय ठरला. त्यानं पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत 54.31 सेकंदाची वेळ नोंदवली आणि 27 वे स्थान मिळविलं. कुशाग्र रावत पुरुषांच्या 200 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत त्याच्या हीटमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. तिसऱ्या हीटमध्ये त्यानं एक मिनिट 54.56 सेकंद अशी वेळ नोंदवली.
50 मीटर बटरफ्लाय हीटमध्ये साजन प्रकाश आठव्या क्रमांकावर
यापूर्वी साजन प्रकाश पुरूषांच्या 50 मीटर बटरफ्लाय हीटमध्ये आठव्या क्रमांकावर राहिला. तिथे त्यानं 25.01 सेकंदची वेळ नोंदवली. पहिल्या 16 मध्ये आलेल्या खेळाडूंनी उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती. तर, कुशाग्र पुरूषांच्या 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये 3:57.45 सेकंदाची वेळ नोंदवून आपल्या हीटमध्ये अखेरच्या स्थानावर राहिला.
हे देखील वाचा-
- CWG 2022: कॉमनवेल्थमच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचं दमदार प्रदर्शन, श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेला 2-0 नं नमवलं
- ICC T20 World Cup 2022: रविचंद्रन अश्विनचं टी-20 विश्वचषकात खेळणं कठीण; भारतीय माजी खेळाडूच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष
- CSK: महेंद्रसिंह धोनी, सीएसकेसह भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; स्टार खेळाडूची दुखापतीवर मात