एक्स्प्लोर

शुभमन की ऋतुराज? आफ्रिकेविरोधात कोणते 11 शिलेदार उतरणार? 

Team India Playing 11 Vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यादरम्यान दुसरा टी 20 सामना आज होणार आहे.

IND vs SA 2nd T20 : भारत आणि दक्षिण अफ्रिका (IND vs SA) यांच्यादरम्यान दुसरा टी 20 सामना आज होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दोन्ही संघ सेंट जॉर्ज पार्क मैदानात आमने सामने असतील. या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असेल? (Team India Playing 11) सलामीला कोण उतरणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. या प्रश्नाचे उत्तर काही तासांत मिळणार आहे. 

खेळपट्टी कशी आहे ?

सेंट जार्ज पार्क मैदानात आतापर्यंत फक्त तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलाय. तर एका सामन्यात धावांचा पाठलाग करत विजय मिळवण्यात आलाय. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 179 इतकी आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. वेगवान गोलंदाज प्रभावी ठरु शकतात. 

दीपक चाहर अद्याप भारतातच - 

बॉलिंग ऑलराऊंडर दीपक चाहर अद्याप संघासोबत जोडला नाही. कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल असल्यामुळे चाहर अद्याप संघासोबत जोडला नाही. अशा स्थितीत तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. सुत्रांच्या वृत्तानुसार, तो टी 20 मालिकेतून माघार घेऊ शकतो. 

सलामीला कोण ?
यशस्वी जैस्वालने आपल्या फलंदाजीची आक्रमकता दाखवली आहे आणि शुभमन गिल आता सर्व फॉरमॅटमध्ये पहिली पसंती बनला आहे, तर ऋतुराज गायकवाडला 52 चेंडूत 100 धावा केल्यानंतर दुर्लक्ष करणे कठीण होईल. अडचण अशी आहे की जैस्वाल, गिल आणि गायकवाड यांच्यापैकी सलामीला कोण उतरणार? या प्रश्नाच उत्तर चाहत्यांना नाणेफेकीनंतरच मिळेल.  

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 हेड टू हेड
सामने : 24
भारत : 13
दक्षिण आफ्रिका : 10
निर्णय नाही : 01
दक्षिण आफ्रिकेत 

सामने: 07
भारत : 05
दक्षिण आफ्रिका : 02

 दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताची संभाव्य प्लेईंग 11 - 

शुभमन गिल/ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज.

भारतात कधी पाहायला मिळणार सामना ?

भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये 'सेंट जॉर्ज पॉर्क' मैदानावर सामना होणार आहे. आफ्रिकेत हा सामना सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे, भारतामध्ये 8.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात - 

 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची T20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळाणार आहे.   सूर्यकुमार यादव याच्याकडे टी 20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वनडेमध्ये केएल राहुल कर्णधार असेल आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा धुरा संभाळणार आहे.  दुसरा T20 सामना 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 सामना 14 डिसेंबरला होणार आहे. 

दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड  
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget