सौरव गांगुलीनं बीसीसीआय अध्यक्षपद सोडलं नाही, जय शाह यांची माहिती
Sourav Ganguly Resign : सौरव गांगुली यांनी अद्याप बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.
Sourav Ganguly Resign : सौरव गांगुली यांनी अद्याप बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयला दिली आहे. बुधवारी सायंकाळी सौरव गांगुली यांनी ट्वीट करत नवी इनिंग सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. एएनआयशी बोलताना जय शाह यांनी सौरव गांगुली यांनी अद्याप बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडलं नसल्याचं सागितलेय.
ऑक्टोबर 2022 मध्ये सौरव गांगुली आणि जय शाह यांचा बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव म्हणून कार्यकाळ संपणार होता. पण त्याआधीच सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. ऑक्टोबर 2019 मध्ये सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सांभाळला होता. त्याआधी सौरव गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघाचे चीफ म्हणून काम पाहिलेय.
Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI: Jay Shah, BCCI Secretary to ANI pic.twitter.com/C2O3r550aL
— ANI (@ANI) June 1, 2022
सौरव गांगुली यांनी भावूक ट्वीट करत नवीन इनिंग सुरु करणार असल्याची माहिती दिली. आतापर्यंतच्या प्रवासात सोबत असणाऱ्या चाहत्यांचं आणि सहकारी खेळाडूंचं सौरव गांगुली यांनी आभार व्यक्त केलेय. तसेच सौरव गांगुली यांनी पुढील वाटचालीसाठी समर्थन मागितलेय.
सौरव गांगुलीने ट्विटमध्ये काय म्हटलेय?
2022 माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे. कारण, क्रिकेटमध्ये करिअर सुरु करुन 30 वर्ष पूर्ण झाली. 1992 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. 30 वर्षांच्या प्रवासात क्रिकेट खेळत असताना सर्वांकडूनच सपोर्ट मिळाला. क्रिकेटने मला खूप काही दिले. या प्रवासात मला अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे धन्यवाद. आता नव्या नवीन इनिंग सुरुवात करणार आहे. यामध्ये सर्वांचा सपोर्ट मिळेल, अशी आपेक्षा आहे.
सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करणार?
गेल्या महिन्यात अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा अस्वाद घेतला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये अनेक विषयांबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे सौरव गांगुली लवकरच भाजपमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सौरव गांगुलीला लोकसभेचं तिकीट देण्यात येणार आहे.
आणखी वाचा :
सौरव गांगुलीनं बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडलं, नवी इनिंग सुरु करणार