Kolkata Murder Case : सौरव गांगुलीने DP बदलल्यावर टीका, आता पत्नीसोबत आंदोलनातही उतरणार, कोलकाता हत्याप्रकरणी दादा मैदानात!
Sourav Ganguly on Kolkata Murder Case : सोमवारी रात्री भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने X (Twitter) वरील त्याचा प्रोफाइल फोटो बदलला त्यानंतर....
Sourav Ganguly & Dona Ganguly Protest : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर सौरव गांगुलीने नुकतेच एक विधान केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता.
या वादानंतर माजी कर्णधाराने पुढे येऊन आपले स्पष्टीकरण पण दिले होते. या घटनेच्या निषेधार्थ सौरव गांगुलीने सोशल मीडिया अकाऊंट X वरून त्याचा प्रोफाईल फोटो काढून टाकला. त्याने त्याचा प्रोफाईल डीपी ब्लॅक केला.
खंरतर, कोलकाता हत्याकांड बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ त्याने आपला प्रोफाईल फोटो बदला होता. यानंतर सौरव गांगुलीला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र आता सौरव गांगुलीनं मोठं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरव गांगुली पत्नी डोना गांगुलीसह कोलकाता येथे आंदोलन करणार आहे.
सौरव गांगुलीने प्रोफाईल फोटो बदलल्या नंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी प्रोफाईल बदलल्या नंतर त्याच्यावर टीका केली. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी माजी भारतीय कर्णधाराचा बचाव केला आणि म्हटले की तो पुढे आला हे कौतुकास्पद आहे. सौरव गांगुलीशिवाय मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या क्रिकेटपटूंनी या बलात्कार-हत्या प्रकरणावर आवाज उठवला आहे.अलीकडेच सौरव गांगुली म्हणाला होता की, ही खूप
भयानक गोष्ट आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे काही घडले ते अत्यंत लज्जास्पद आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मला अपेक्षा आहे. शिक्षा अशी असावी की आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणी करू नये. शिक्षा कठोर असणं महत्त्वाचं आहे.