Smriti Mandhana... बस नाम ही काफी है...! 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धमाकेदार खेळी, रचला इतिहास
स्मृती मानधना (Smriti Mandhana) ने फक्त 57 चेंडूत शतक पूर्ण केलं. डावाच्या 18व्या षटकात मंधानाचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला.
Smriti Mandhana Scores Century: भारताच्या महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) ने महिला बिग बॅश लीग (Women's Big Bash League) सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. सिडनी थंडरच्या स्मृती मानधनाने मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्यात 64 चेंडूत नाबाद 114 धावांची खेळी केली. त्याने 178.12 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. मंधानाने या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले.
स्मृती मानधना (Smriti Mandhana) ने फक्त 57 चेंडूत शतक पूर्ण केलं. डावाच्या 18व्या षटकात मंधानाचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. तिने पहिल्या पाच चेंडूत 4,6,4,6,2 धावा करत आपले शतक पूर्ण केले. या स्पर्धेत शतक झळकावणारी मंधाना ही भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
A beautiful innings!
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 17, 2021
Congratulations, @mandhana_smriti 🤩 #WBBL07 pic.twitter.com/Jwo4E1fN3X
‘असा’ खेळ करणारी दुसरी खेळाडू
स्मृती मानधना (Smriti Mandhana) ने ऑस्ट्रेलियामध्ये तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पॅरी ने तीनही फॉरमॅटमध्ये शतकावण्याची कामगिरी केली आहे. स्मृती मानधनाने याआधी 2016 च्या एकदिवसीय सामन्यात 109 चेंडूत 102 धावा आणि 2021 मध्ये डे-नाइट कसोटी सामन्यात 216 चेंडूत 127 धावा केल्या होत्या. तर आता टी 20 सामन्यात 64 चेंडूत 114 धावा केल्या आहेत. मात्र, स्मृती मानधनाच्या खेळीनंतरही सिडनी संघाला विजय मिळवता आला नाही. मेलबर्नच्या 175 धावांना प्रत्युत्तर देताना सिडनीला निर्धारित 20 षटकांत 2 गडी गमावून 171 धावाच करता आल्या.
उजव्या हाताने लिहिणे, डाव्या हाताने तडाखे... स्मृती मानधनाचा प्रवास!
स्मृती मानधना ही भारतीय महिला क्रिकेटमधील एक नवीन तारा म्हणून उदयास येते आहे. तिच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे सांगलीसह महाराष्टची शान स्मृतीच्या कामगिरीने देशभर उंचावली आहे.
स्मृती श्रीनिवास मानधना... वय अवखे 20 वर्षे... स्मृतीचं नाव आज संपूर्ण जगभर क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचलं आहे. 18 जुले 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्मृतीचे कुटुंब स्मृती अवघी 4 वर्षांची असताना सांगलीत आले. स्मृतीचे वडील निष्णात क्रिकेटपटू. पण व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना हा क्रिकेट फार काळ पुढे खेळता आला नाही. मात्र, आपल्या मुलामध्ये त्यांनी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले. मुलाला प्रशिक्षण देताना नकळत स्मृतीला देखील क्रिकेटचे वेड कधी लागले हे कुणालाच कळले नाही आणि वयाच्या नवव्या वर्षी स्मृतीला क्रिकेटचे अधिकृत बाळकडू मिळायला सुरुवात झाली. आजच्या तिच्या या यशाने तिच्या आई-वडिलांच्या आनंदला पारावर उरला नाही.
दहावीपर्यंतचे शिक्षण सांगलीतच घेत असताना स्मृतीने क्रिकेटचा चांगला सराव केला. सांगलीतीलच छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ती क्रिकेटचा सराव करत असे. स्मृती तशी उजव्या हाताने लिखाण करणारी. पण तिच्या वडिलांनी आणि ट्रेनरनी तिला जाणिवपूर्वक डावखुरी फलंदाज बनवलं. यामुळे आज स्मृती ही दिमाखदार कामगिरी करत आहे. शिवाय, अनेक दुखापतींना सामोरे जात स्मृतीने ही चमकदार कामगिरी केल्याचे तिचे फिटनेस ट्रेनर सांगतात.
संबंधीत बातम्या
ती मानधनानं रचला इतिहास, पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू
स्मृती मानधनाची विश्वविक्रमाला गवसणी; जगात पटकावले तिसरे स्थान