एक्स्प्लोर

स्मृती मानधनाची विश्वविक्रमाला गवसणी; जगात पटकावले तिसरे स्थान

वेस्ट इंडिज सोबतच्या महिला क्रिकेट संघांची वन डे मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली आहे. या सोबतच महिला क्रिकेटर स्मृती मानधनानं एका विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.

पोर्ट ऑफ स्पेन - कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने विंडीजवर मात करत ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली. यात खेळताना मराठमोळ्या स्मृती मानधनाने ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. सोबतच एका विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिज सोबतच्या महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत मालिका 2-1 अशी जिंकली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारताने 6 विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजचे 194 धावांचे लक्ष्य भारतीय महिलांनी 42.1 षटकांत पूर्ण केले. या सामन्यात स्मृती मानधनाने वन-डे क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. स्मृती मानधनाने केवळ ५१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. याआधी भारताच्या शिखर धवनने ४८ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. याचसोबत महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करुन दाखवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मृती तिसऱ्या स्थानी आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि मेग लेनिंग या महिला फलंदाजांनी सर्वात जलद २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. स्मृती मानधनाची वन-डे मधील आजपर्यंतची कामगिरी स्मृती मानधनाच्या नावावर सध्या २ हजार २५ धावा आहेत. ५१ वन-डे सामन्यांच्या कारकिर्दीत स्मृतीने आतापर्यंत ४३ च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतकं आणि १७ अर्धशतकंही आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Eng vs IND 4th T20 : श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
England vs India 4th T20 Live : श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा
टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार...; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 206 धावा

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
Embed widget