पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची कसोटी, 2019 पासून प्रतिस्पर्धी संघासाठी ठरले कर्दनकाळ
2019 वनडे वर्ल्ड कपनंतर झालेल्या 29 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 27 च्या सरासरीने 163 विकेट घेतल्या आहेत.
Pakistan Team Fast Bowlers Performance : विश्वचषकात पाकिस्तानची गोलंदाजी नेहमीच भेदक राहिली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात एकापेक्षा एक सरस गोलंदाजांची नोंद आहे. त्यामध्ये वसीम अक्रमपासून वकार यूनिस, शोएब अख्तर यांच्यापर्यंतच्या नावाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ पाकिस्तानच्या गोलंदाजीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाढत आहेत. त्यामध्ये आता नसीम शाह याचाी समावेश झालाय. पाकिस्तानची तिकडी जगभरातील अव्वल गोलंदाजामध्ये आहे. त्यांचा स्पेस आणि स्विंग भल्या भल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकतो. आशिया चषकाआधी पाकिस्तानचे गोलंदाज भन्नाट फॉर्मात दिसत आहेत. आफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाला शंभर धावांपर्यंत पोहचता आले नाही. शाहीन अफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या तिघांनी मिळून आठ विकेट घेतल्या. 2019 च्या वनडे विश्वचषकानंतर पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केलाय. इतर देशाच्या गोलंदाजापेक्षा पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगल्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत.
2019 वनडे वर्ल्ड कपनंतर झालेल्या 29 वनडे सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 27 च्या सरासरीने 163 विकेट घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या गोलंदाजांचा समावेश आहे. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी 45 सामन्यात 28.33 च्या सरासरीने 189 विकेट घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजी आक्रमण या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय गोलंदाजांनी 30.44 च्या सरासरीने 258 विकेट घेतल्या आहेत.
Pakistan's pacers are on another planet! They are unbelievable 👏
— Farid Khan (@_FaridKhan) August 24, 2023
Since the 2019 World Cup, Pakistan bowlers have taken 8 five-wicket hauls in ODIs - the most by any team. via Mazher Arshad
We are blessed Ma Shaa Allah ❤️ #AFGvPAK pic.twitter.com/rYO7vV3GA8
आशिया कपमध्ये भारताच्या गोलंदाजांची कसोटी
30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीची खरी कसोटी पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी पाहायला मिळणार आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेत पूर्ण क्षमतेने खेळेल. अशा स्थितीत विश्वचषकापूर्वी भारताला आपल्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय गोलंदाजी आक्रमणही संतुलीत दिसत आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे.
30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
तारीख | फेरी | सामना | ठिकाण | कधी होणार सामना |
30 ऑगस्ट 2023 | 1 | पाकिस्तान vs नेपाळ | मुल्तान, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
31 ऑगस्ट 2023 | 1 | बांगलादेश vs श्रीलंका | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
2 सप्टेंबर 2023 | 1 | पाकिस्तान vs भारत | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
3 सप्टेंबर 2023 | 1 | बांगलादेश vs अफगाणिस्तान | लाहोर, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
4 सप्टेंबर 2023 | 1 | भारत vs नेपाळ | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
5 सप्टेंबर 2023 | 1 | श्रीलंका vs अफगाणिस्तान | लाहोर, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
6 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A1 vs B2 | लाहोर, पाकिस्तान | दुपारी 3 वाजता |
9 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | B1 vs B2 | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
10 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A1 vs A2 | कँडी, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
12 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A2 vs B2 | दांबुला, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
14 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A1 vs B1 | दांबुला, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
15 सप्टेंबर 2023 | 2 (सुपर - 4) | A2 vs B2 | दांबुला, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |
17 सप्टेंबर 2023 | फायनल | S4 1 vs S4 2 | कोलंबो, श्रीलंका | दुपारी 3 वाजता |