Shubman Gill IND vs NZ Match: साडे 'गिल' दा मामला है... विराट, रोहितला टाकलं मागे, एकाच सामन्यात रचला विक्रमांचा डोंगर
Shubman Gill IND vs NZ Match: न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शतक आणि द्विशतक ठोकल्यावर आता टी20 सामन्यातही शुभमननं शतक ठोकलंय.
Shubman Gill IND vs NZ Match: भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. गिल न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ Match) कारकिर्दीतील सहावा टी-20 सामना (T20 Match) खेळण्यासाठी अहमदाबादला (Ahmedabad) पोहोचला. या सामन्यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 (International T20) मध्ये अर्धशतकही ठोकलं नव्हतं. पण कालच्या सामन्यात गिलनं शतक झळकावलं आणि विक्रमांचा डोंगरंच रचला.
न्यूझीलंडविरुद्धच्या अहमदाबाद टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवी संघ कधीच विसरू शकणार नाही. किवींचा गिलनं पार धुव्वा उडवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गिलचं वादळ रोखणं किवींसाठी जवळपास अशक्यच होतं. शुभमन गिलनं न्यूझीलंडविरुद्ध 63 चेंडूत 126 धावांची धडाकेबाज खेळी केली. गिलनं 35 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यानंतर पुढे फक्त 19 चेंडूंत त्यानं शतक पूर्ण केलं.
गिलनं 200 च्या स्ट्राईक रेटनं काढल्या धावा
कालच्या सामन्यात शुभमन गिलनं 7 षटकार आणि 12 चौकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 होता. गिलनं कसोटीत 4 आणि एकदिवसीय सामन्यात 4 शतकं झळकावली आहेत. आता त्यानं टी-20 मध्येही शतक झळकावलं आहे. नुकतंच त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत द्विशतक आणि एक शतक झळकावलं. दरम्यान, कालच्या सामन्यातील शतक त्याचं टी-20 मधील पहिलं वहिलं शतक झळकावलं.
गिल T20 मध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू
शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 126 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज भारतीयांना मागे टाकलंय. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये आतापर्यंत केवळ 7 फलंदाजांना शतक झळकावता आलं होतं. गिल, कोहली, रोहित यांच्याशिवाय सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि दीपक हुडा या खेळाडूंचा यादीत समावेश आहे.
.@ShubmanGill scored a remarkable 126* off just 63 deliveries and bagged the Player of the Match award as #TeamIndia registered a 168-run victory in the #INDvNZ T20I series decider 👏🏻👏🏻
— BCCI (@BCCI) February 1, 2023
Scorecard - https://t.co/1uCKYafzzD… #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/OhPzHbgxsK
'या' 20 खेळाडूंनी तिनही फॉरमॅटमध्ये झळकावलं शतक
भारतासह जगात एकूण 20 खेळाडू आहेत, ज्यांनी आतापर्यंत क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये शतकं झळकावलंय. यामध्ये गिलचा 20 व्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि शुभमन गिला या भारतीय खेळाडूंचा या यादीत समावेश होतोय.
भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त जागतिक क्रिकेटमधील तिनही फॉरमॅटमध्ये शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, शेन वॉटसन, केविन ओब्रायन, ब्रेंडन मॅक्युलम, फाफ डू प्लेसिस, ख्रिस गेल, अहमद शहजाद, मार्टिन गुप्टिल, तिलकरत्ने दिलशान, मोहम्मद रिझवान, डेव्हिन मलान, तमीम इक्बाल, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे.
टीम इंडियाकडून 168 धावांनी किवींचा धुव्वा
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने 168 धावांच्या फरकानं विजय मिळवला. हा भारताचा T20 मधील सर्वात मोठा विजय आहे.