Shubman Gill Ind vs Sa 1st T20 : उपकर्णधार असला तरी स्वतःला सिद्ध करावेच लागणार...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्याआधी शुभमन गिलला मिळाली वॉर्निंग
Irfan Pathan Statement Shubman Gill Spot In T20 : भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आता पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज आहे.

India vs South Africa 1st T20 : भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आता पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान त्याच्या मानेत झालेल्या दुखापतीमुळे त्याला तब्बल तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागले. मात्र आता टी20 मालिकेत तो पुनरागमन करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील टी20 मालिकेचा पहिला सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
गिलबद्दल इरफान पठान काय म्हणाले?
माजी भारतीय ऑलराउंडर इरफान पठानच्या (Irfan Pathan) मते शुभमन गिलसमोर टी20 संघात स्वतःची जागा पक्की करण्याची मोठी संधी आहे. जिओस्टारशी बोलताना तो म्हणाला की, "शुभमन गिलने टी20 क्रिकेटमध्ये टॉप ऑर्डरमध्ये स्वतःची जागा मजबूत करायला हवी. सर्व फॉर्मेटमध्ये सातत्याने चांगले खेळणाऱ्या खेळाडूंना नेहमीच महत्त्व मिळते. त्याचा आयपीएलमधील परफॉर्मन्स पाहिला तर तो किती प्रभावी खेळाडू आहेत हे स्पष्ट होते. पाच सामन्यांची ही मालिका त्याला पुरेसे संधी देईल. छोट्या दुखापतीनंतर तो परतत आहेत आणि चांगल्या विकेट्सच्या खेळपट्टीवर त्याला नक्कीच खेळण्याचा आनंद मिळेल."
टी20 मध्ये गिलच्या कामगिरीत घसरण
टी20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिलची कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही. 33 सामन्यांत त्याची सरासरी 30 पेक्षाही कमी, स्ट्राइक रेट सुमारे 140चा आहे. आशिया कपनंतर खेळलेल्या 12 सामन्यांत एकही अर्धशतक नाही. या 12 सामन्यात त्याने 28.77 च्या सरासरीने 259 धावा केल्या, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 47 होता. आशिया कपच्या 7 सामन्यांत फक्त 127 धावा केल्या. संजू सॅमसनला ओपनिंगमधून हटवून गिलला पुन्हा वर खेळवले जात आहे, जिथे 2024 पासून संजूने तीन शतके झळकावली होती.
लोअर-मिडल ऑर्डरवरही इरफान पठानची प्रतिक्रिया
इरफान म्हणाला की, पुढील वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याबरोबर एक विश्वासू फिनिशर तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. "हार्दिकसोबत फिनिशरची भूमिका कोण निभावतो आणि किती प्रभावीपणे खेळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आपला लोअर-मिडल ऑर्डर दमदार फॉर्ममध्ये असायला हवा. अक्षर, जितेश आणि रिंकू हे पर्याय आहेत, पण त्यापैकी हार्दिकसोबत जुळवून घेणारा सर्वोत्तम कोण हे पाहणे गरजेचे आहे."
हे ही वाचा -





















