Shubman Gill : शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये भरती! डॉक्टर काय म्हणाले?; कसोटी मालिकेतून बाहेर गेला तर कोण असणार टीम इंडियाचा कर्णधार?
Shubman Gill Hospital Update Marathi News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फक्त दोन दिवसांतच मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे.

Ind vs Sa 1st Test Shubman Gill Update News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फक्त दोन दिवसांतच मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे. सामना तिसऱ्या दिवशीच संपणार असे संकेत मिळत आहेत. टीम इंडिया या कसोटीमध्ये वरचढ स्थितीत असली तरी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलला सामन्यादरम्यान अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. दुसऱ्या दिवशी बॅटिंगदरम्यान गिलच्या मान दुखू लागल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र आता त्याला कोलकात्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो खेळणार की नाही? आणि तो जर खेळला नाही तर टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
🚨 Update 🚨
— BCCI (@BCCI) November 16, 2025
Captain Shubman Gill had a neck injury on Day 2 of the ongoing Test against South Africa in Kolkata. He was taken to the hospital for examination after the end of day's play.
He is currently under observation in the hospital. He will take no further part in the… pic.twitter.com/o7ozaIECLq
चौकार मारताच रिटायर्ड हर्ट... नेमकं काय घडलं?
ईडन गार्डन्सवर चालू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रसंग घडला. शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी भारताने पहिली इनिंग पुढे सुरू केली. पहिल्या सेशनमध्ये वॉशिंगटन सुंदर आऊट झाल्यानंतर कर्णधार गिल मैदानात उतरला. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने स्वीप शॉट खेळत चौकार मारला. पण शॉट मारताच त्याने मान धरली आणि हेल्मेट काढले. टीमच्या फिजिओने तपासणी केल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन परतला.
कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये भरती, डॉक्टर काय म्हणाले?
यानंतर गिल पूर्ण इनिंगमध्ये बॅटिंगला उतरलाच नाहीत. मात्र आता टीम इंडियाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, शुभमन गिलला कोलकात्यातील वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून तो पूर्ण रात्री तेथे निरीक्षणाखाली होता. डॉक्टरकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू केले आहेत. किती काळ रुग्णालयात राहावे लागेल किंवा अधिक उपचारांची गरज आहे का? हे पुढील तपासणीनंतरच कळेल, असे डॉक्टर म्हणाले.
कसोटी मालिकेतून बाहेर गेल्यावर कोण असणार टीम इंडियाचा कर्णधार?
बीसीसीआयने मात्र याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तरीही परिस्थिती पाहता असं वाटतं की भारताची दुसरी इनिंग आली तर गिलचे खेळणे कठीण आहे. चिंतेची बाब म्हणजे जर ही दुखापत गंभीर ठरली, 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीमधून तो बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या डावात गिल मैदानाबाहेर गेल्यानंतर ऋषभ पंतने कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची कर्णधाराची धुरा सांभाळली. जर गिल दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध झाला नाहीत, तर गुवाहाटी सामन्यातही पंतच टीमचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
हे ही वाचा -





















