एक्स्प्लोर

Ind vs Pak : वैभव-प्रियांश सलामीवीर, तर कर्णधार जितेश शर्मा....; पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कशी असेल Playing XI? किती वाजता रंगणार सामना? जाणून घ्या सर्वकाही

India vs Pakistan Asia Cup Rising Stars Live Streaming : भारत–पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रंगणार असून, या लढतीत सर्वांची नजर असेल ती तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीवर.

India vs Pakistan Asia Cup Rising Stars 2025 : भारत–पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रंगणार असून, या लढतीत सर्वांची नजर असेल ती तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीवर. अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने यूएईविरुद्धच्या सामन्यात फक्त 32 चेंडूत शतक ठोकत विक्रमांचा पाऊस पाडला. आता पुन्हा एकदा भारत–पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भिडणार आहे. एसीसी मेन्स आशिया कप राइजिंग स्टार्स 2025मध्ये भारत-अ संघ आणि पाकिस्तान अ संघ आमनेसामने येणार आहेत. 

हा ग्रुप-बीतील महत्त्वाचा सामना 16 नोव्हेंबर (रविवार) रोजी, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता, दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यूएईविरुद्धचा सामना जिंकत भारत-अ संघाला मौल्यवान 2 गुण मिळाले आणि अंकतालिकेतही संघाने अव्वल स्थान पटकावले. आता रविवारी होणाऱ्या भारत-अ विरुद्ध पाकिस्तान अ या महत्त्वाच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रिकेटप्रेमी या लढतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वैभव-प्रियांश सलामीवीर, तर....

यूएईविरुद्ध टीमने दाखवलेल्या दमदार खेळानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. 144 धावांची धडाकेबाज खेळी करणारा वैभव सूर्यवंशी पाकिस्तानविरुद्धही प्रियांश आर्यासोबत डावाची सुरुवात करणार आहे. प्रियांश पहिल्या सामन्यात फारसा चमकू शकला नाही, पण या संघर्षपूर्ण सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

मध्यफळीत नमनधीर आणि कर्णधार जितेश

तिसऱ्या क्रमांकावर नमनधीर तर चौथ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार जितेश शर्मा उतरू शकतो. यूएईविरुद्ध नमनधीरने 34 धावा तर जितेशने तुफानी 83 धावा ठोकल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर नेहल वढेरा, सहाव्या क्रमांकावर रमनदीप सिंह, तर सातव्या क्रमांकावर आशुतोष शर्मा फिनिशरची भूमिका निभावू शकतो.

भारताची गोलंदाजी ठरेल महत्त्वाची

गोलंदाजीत यश ठाकुर, गुरजपनीत सिंह आणि युयश शर्मा हे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. याशिवाय हर्ष दुबेही गोलंदाजीत पर्याय उपलब्ध करून देतात. गरज पडल्यास नमनधीर किंवा नेहल वढेरा या पार्टटाइम गोलंदाजांचाही उपयोग होऊ शकतो. पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताची फलंदाजी–गोलंदाजी दोन्हीही संतुलित दिसत असून, चाहत्यांना रोमांचक लढतीची अपेक्षा आहे.

किती वाजता रंगणार सामना? जाणून घ्या सर्वकाही (When & where to watch IND vs PAK Asia Cup Rising Stars)

वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दोहा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे, जो रात्री 8 वाजता सुरू होईल. भारतातील अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ हा सामना Sony Sports Ten 1 SD आणि Sony Sports Ten 1 HD या चॅनेल्सवर थेट प्रसारित केला जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony LIV अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघाचा संभाव्य संघ -  (India vs Pakistan Asia Cup Rising Stars Playing XI)

वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नमंधीर, जितेश शर्मा (कर्णधार आणि यष्टीरक्षक), नेहल वढेरा, रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, सुयश शर्मा.

हे ही वाचा -

Ind vs Pak Asia Cup Rising : 42 चेंडूत 144 धावा ठोकणारा वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानशी भिडणार, भारत-पाक सामना कधी, कुठे पाहणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget