(Source: Poll of Polls)
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचा रॉकेट थ्रो, कमिंडू मेंडिसचा करेक्ट कार्यक्रम, प्रेक्षकांनी डोक्याला हात लावला, पाहा व्हिडीओ
Shreyas Iyer : भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यरनं कमिंडू मेंडिसला धावबाद केलं. कमिंडू मेंडिसनं भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होतं.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर दुसरी मॅच सुरु आहे. श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं पहिल्या मॅच प्रमाणं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं पहिल्या मॅचच्या तुलनेत दुसऱ्या मॅचमध्ये 10 धावा अधिक केल्या आहेत. श्रीलंकेकडून फर्नांडो, कुसल मेंडिस (Kamindu Mendis), दुनिथ वेल्लालगे आणि कमिंडू मेंडिस यांनी चांगली फलंदाजी केली. तर, भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखलं. दुनिथ वेल्लालगे बाद झाल्यानंतर कमिंडू मेंडिसनं श्रीलंकेचा डाव सावरला. मात्र, श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) एका थ्रोमुळं कमिंडू मेंडिसला थेट मैदानाबाहेर जावं लागलं.
श्रेयस अय्यरचा अफलातून थ्रो
श्रीलंकेच्या डावाच्या 50 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. श्रीलंकेच्या कमिंडू मेंडिसनं 39 धावा करत संघाचा डाव सावरण्यात मदत केली. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कमिंडू मेंडिसनं केला. बॉल हवेत गेला मात्र सीमापार जाऊ शकला नाही. फिल्डींग करणाऱ्या श्रेयस अय्यर पर्यंत बॉल गेला इकडे कमिंडू मेंडिस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. पहिली धाव पूर्ण झाल्यानंतर कमिंडू मेंडिस दुसऱ्या रनसाठी धावत गेला. मात्र, श्रेयस अय्यरच्या अफलातून थ्रो मुळं कमिंडू मेंडिसला थेट मैदानाबाहेर जावं लागलं. कमिंडू मेंडिस श्रेयस अय्यरच्या थ्रोवर बाद झाला यावर क्षणभर अनेकांना विश्वास बसला नाही. त्यामुळं कमिंडू मेंडिस ज्यावेळी बाद झाला त्यावेळी श्रीलंकेच्या प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी थेट डोक्याला हात लावला.
भारतापुढं विजयासाठी 241 धावांचं आव्हान
श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेटवर 241 धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं श्रीलंकेला पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर निसांकाची विकेट घेत धक्का दिला. यानंतर फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. फर्नांडो 40 तर कुसल मेंडिसनं 30 धावा केल्या. या दोघांना वॉशिंग्टन सुंदरनं बाद केलं. यानंतर श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका देखील वॉशिंग्टन सुंदरच्या जाळ्यात अडकला. तो 25 धावांवरबाद झाला. दुनिथ वेल्लालगे आणि कमिंडू मेंडिस यांनी श्रीलंकेच्या संघाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला. दुनिथ वेल्लालगे यानं 39 धावा केल्या वेल्लालगे याची विकेट कुलदीप यादवनं घेतली. कमिंडू मेंडिस यानं अखेरीस फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. कमिंडू मेंडिसनं 40 धावा केल्या. यामुळं श्रीलंकेचा संघ 9 विकेटवर 240 धावा करु शकला. भारताला विजयासाठी 241 धावांची गरज आहे.
पाहा व्हिडीओ:
Aimed to perfection 🎯
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2024
Watch the action from #SLvIND LIVE now on Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 4 & Sony Sports Ten 5 📺
#SonySportsNetwork #TeamIndia | @ShreyasIyer15 pic.twitter.com/GOddmoleJH
संबंधित बातम्या :
Shubman Gill : शुभमन गिलचं वनडेतील स्थान धोक्यात येईल.. पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा सूचक इशारा