Shoaib Akhtar in Trouble: लाईव्ह टीव्ही शो सोडणं शोएब अख्तरच्या अंगलट, पीटीव्ही चॅनेलनं ठोकला 10 कोटींचा दावा
Shoaib Akhtar in Trouble: पीटीव्हीच्या नोटीशीनंतर शोएब मलिकनं कायदेशीर लढाई लढण्याची घोषणा केलीय.
Shoaib Akhtar in Trouble: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. पीटीव्ही (PTV) चॅनेलच्या ‘गेम ऑन है’ या लाईव्ह कार्यक्रमात अँकरशी वाद झाल्यानंतर शोएब मलिकनं थेट ऑन-एअर राजीनामा दिला. ज्यामुळे त्यांच्यातील कराराचं उल्लंघन झालं. तसेच यामुळं पीटीव्हीचंही मोठं नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, चॅनेलनं अख्तरला 10 कोटी मानहानीची नोटीस पाठवलीय. पीटीव्हीच्या नोटीशीनंतर शोएब मलिकनं कायदेशीर लढाई लढण्याची घोषणा केलीय.
एएनआयच्या अहवालानुसार, “कॉन्ट्रॅक्टच्या नियमांप्रमाणे 3 महिन्याची नोटिस दिल्याशिवाय चॅनेल किंवा त्याठिकाणी काम करणारे एकमेंकापासून वेगळे होऊ शकत नाहीत. मात्र, अख्तरने 26 ऑक्टोबर रोजी चालू शोमध्ये राजीनामा दिला. ज्यामुळे पीटीव्ही चॅनेलचं मोठं नुकसान झालं आहे”, असे नॅशनल टेलीव्हीजन अॅमिनिस्ट्रेशनने नोटिसमध्ये लिहिलंय.
नेमकं काय घडलं?
पीटीव्हीच्या 'गेम ऑन है' या कार्यक्रमात शोएब अख्तरनं पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हारिफ रौफ यांच्या कामगिरीचे कौतूक केलं. तसेच लाहोरच्या कलंदर्स संघातून हे दोन्ही खेळाडू संघात समील झालेत, असेही त्याने म्हटलं. त्यावेळी शोचा अँकर नोमान नियाजनं शाहिन अफ्रिदी पाकिस्तानच्या अंडर-19 मध्येही असल्याचं शोएब अख्तरला आठवण करून दिली. यावर शोएबनं मी हारिफ रौफबद्दल बोलतोय असं म्हटलं. परंतु, शोएब अख्तरनं ज्या अंदाज उत्तर दिलं, हे नियाजला आवडलं नाही. ज्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी नियाजनं अख्तरला चांगलंच सुनावलं. तसंच असं ओव्हरस्मार्ट वागणार असाल तर, तुम्ही शोमधून जाऊ शकता असंही नियाजनं म्हटलं. याचदरम्यान, शोएब मलिकनं ऑन एअर राजीनामा देत लाईव्ह टीव्ही शो सोडून निघून गेला.
हे देखील वाचा-