T20 WC 2021 : विराट-रवी शास्त्रींना विजयी निरोप? भारत-नामिबिया यांच्यात औपचारिक सामना
ICC T20 WC 2021 : विराट कोहलीच्या नेतृत्वातील आणि रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाकडून कोट्यवधी क्रीडाप्रेमींना मोठ्या आपेक्षा होत्या.
Team India Fail to Make in Last Four : आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील आणि रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाकडून कोट्यवधी क्रीडाप्रेमींना मोठ्या आपेक्षा होत्या. मात्र, या आपेक्षा पुर्ण करण्यात भारतीय संघाला अपयश आलं आहे. आज भारतीय संघ नामिबियाबरोबर औपचारिक लढत खेळणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियाचा दारुण पराभव करत विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना विजयी निरोप देण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. प्रशिक्षक म्हणून आज रवी शास्त्री यांचा अखेरचा सामना आहे. तर विराट कोहलीनेही टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे दुबळ्या नामिबिया संघाचा पराभव करत शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्वप्न धुसूर झाले होते. इतर संघाच्या विजय-पराभवावर भारतीय संघाचं गणित अवलूंब होतं. न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव करत भारताचं स्वप्न धूळीस मिळवलं. ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर भारत 4 गुणासह तिसऱ्या क्रमांकवर आहे. अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.
नामिबियाविरोधात भारतीय संघात फारसे बदल होण्याची शक्यता नाही. राहुल, रोहित, विराट, सुर्यकुमार आणि पंत यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीत बुमराह आणि शामीचा मारा असेल. लेगस्पिनर फिरकी गोलंदाज राहुल चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राहुल चहरला स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते. टी-20 मध्ये भारत पहिल्यांदाच लढणार आहे.
भारताची निराशाजनक कामगिरी –
यंदाच्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशजनक राहिली आहे. साखळी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. तेव्हाच भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून होता. मात्र, न्यूझीलंड संघानं दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. आज, भारत आणि नामिबिया यांच्यामध्ये अखेरचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विश्वचषकात
विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी -
24 ऑक्टोबर- पाकिस्तानकडून 10 विकेटनं पराभव.
31 ऑक्टोबर- न्यूझीलंडकडून 8 विकेटनं पराभव स्विकारला
3 नोव्हेंबर – अफगानिस्तानला 66 धावांनी हरवलं.
5 नोव्हेंबर- स्कॉटलँडचा 8 विकेटनं पराभव केला
8 नोव्हेंबर – नामिबियाविरोधात आज लढत