एक्स्प्लोर

Rishabh Pant : टीम इंडियातून विश्रांतीवर असणाऱ्या पंतचा भीषण अपघात, सर्वत्र जखमा, पुन्हा मैदानावर उतरु शकणार?

Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

Rishabh Pant Health Update : टीम इंडिया (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली. पण या दोन्ही संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही, अन् चर्चांना उधाण आलं, त्यातच आता पंतचा भीषण अपघात झाल्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे, तो पुन्हा मैदानावर परतेल का?  अशा एक न अनेक प्रश्नांनी क्रिकेट चाहत्यांना सतावलं आहे...

तर भारतीय संघाचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज  ऋषभ पंत (Rishabh Pant) आज आयुष्यातील सर्वात मोठा सामना खेळतोय. त्याचा हा सामना आहे नियतीशी...अगदी कालपर्यंत पंत दिल्लीत होता. त्यानं ख्रिसमसचं सेलिब्रेशनही महेंद्रसिंह धोनीच्या घरी केलं. पण श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वन डे मालिकेतून त्याला विश्रांती मिळाल्यानं नवीन वर्षाचं स्वागत आपल्या कुटुंबियांसोबत करण्यासाठी तो दिल्लीतून रुरकीकडे निघाला होता. पण याच दरम्यान पंतचा अपघात झाला आणि त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण क्रिकेट जग हादरुन गेलं. सर्व देश त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. समोर आलेल्याा माहितीनुसार पंतची प्रकृती स्थिर असली तरी जखमा गंभीर असल्याने त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात आलं आहे... बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पंतला कपाळ, उजव्या गुडघ्याचे लिगामेंट, मनगटासह घोटा आणि पाठीला जखम झाली आहे. दरम्यान मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण एका खेळाडूच्या गुडघ्याला खासकरुन लिगामेंटला जखम होण गंभीर आहे, कारण लिगामेंटच गुडघ्यांना मजबूत ठेवते. गुडघ्यांच्या दुखण्यात यामुळे आधार मिळतो. पण लिगामेंटला दुखापत झाल्याने पंतला भविष्यात खेळायला अडचण येऊ शकते. पण त्याची जखम किती गंभीर आहे हे एमआरआय झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, त्यामुळे तूर्तास तरी सर्वजण प्रार्थना करत असून पंत लवकरच मैदानात पुन्हा उतरेल अशी आशा व्यक्त करत आहेत.

कसोटीतील फॉर्म कायम

मागील काही काळापासून मर्यादीत षटकांमध्ये खास कामगिरी करु न शकलेला पंत कसोटीत मात्र फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत पंतनं निर्णायक खेळी केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्यानं केलेल्या 93 धावा भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या.

पंतची दमदार कामगिरी

सामने डाव धावा
कसोटी                       33         2271
एकदिवसीय                30         865
टी20                          66 987
आयपीएल                  98 2838

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Commonwealth Games 2026 : भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget