(Source: Poll of Polls)
Shikhar Dhawan : मोठी घोषणा! निवृत्तीनंतर 'गब्बर' पुन्हा करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन; 'या' लीगमध्ये घालणार धुमाकूळ
Shikhar Dhawan News : गेल्या शनिवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
Shikhar Dhawan Joins Legends League Cricket : गेल्या शनिवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 38 वर्षीय धवनच्या निवृत्तीची बातमी ऐकून भारतीय चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र आता त्यांनी लोकांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्याने लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची घोषणा केली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार शिखर धवनने म्हटले आहे की, "लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सामील होणे हा माझ्यासाठी निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा निर्णय वाटतो. क्रिकेट खेळण्यासाठी माझे शरीर अजूनही तंदुरुस्त आहे. या मी निर्णयाने खूश आहे, क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, जो माझ्यापासून कधीही हिरावून घेतला जाऊ शकत नाही.
लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) कधी सुरू होईल?
लिजेंड्स लीग क्रिकेटची पुढील आवृत्ती सप्टेंबर महिन्यात सुरू होईल, ज्यामध्ये निवृत्त क्रिकेटपटूंचे संघ खेळताना दिसतील. या लीगमध्ये युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि हरभजन सिंगसह अनेक परदेशी क्रिकेटर्सही खेळताना दिसले.
लिजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक रमन रहेजा यांनीही शिखर धवनच्या सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. धवनच्या आगमनाने लीगमधील स्पर्धेची पातळी वाढेल आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहिल्यानंतर चाहते अधिक उत्साह दाखवतील, असे ते म्हणाले.
धवनची आंतरराष्ट्रीय चमकदार कारकीर्द
शिखर धवनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6,793 धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर वनडे फॉर्मेटमध्ये 17 शतके आणि 39 अर्धशतके आहेत. याशिवाय त्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये 2,315 धावा आणि 68 टी-20 सामन्यात 1,759 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा :