Waqar Younis Resigned PAK vs BAN : लाजिरवाण्या पराभवानंतर संघाला मोठा धक्का! 'या' दिग्गजाने दिला तडकाफडकी राजीनामा
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघाचे सध्या खूप वाईट दिवस चालू आहेत. आधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता....
![Waqar Younis Resigned PAK vs BAN : लाजिरवाण्या पराभवानंतर संघाला मोठा धक्का! 'या' दिग्गजाने दिला तडकाफडकी राजीनामा Former Pakistani Cricketer Waqar Younis Resignation As PCB Advisor after PAK vs BAN 1st test Marathi News Waqar Younis Resigned PAK vs BAN : लाजिरवाण्या पराभवानंतर संघाला मोठा धक्का! 'या' दिग्गजाने दिला तडकाफडकी राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/26/f05716b88963bfc53880dc177d59ebb217246568324241091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Waqar Younis Resignation As PCB Advisor : पाकिस्तान क्रिकेट संघाचे सध्या खूप वाईट दिवस चालू आहेत. आधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता शान मसूदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला बांगलादेशकडून त्याच्याच घरच्या मैदानावर 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांना तसेच जाणकारांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशकडून प्रथमच कसोटी सामन्यात पराभूत झाला आहे.
त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्यांचा संतापही सातव्या गगनाला भिडला आहे. संघाला सर्व बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, एका दिग्गज माजी खेळाडूने आपल्या पदाचा राजीनामा देऊन पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे.
संघाला आणखी एक मोठा धक्का
पाकिस्तान क्रिकेट बोर्डही संघाच्या या लाजिरवाण्या कामगिरीच्या दु:खातून बाहेर पडू शकले नाही, दरम्यान बोर्डाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खंरतर, नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य सल्लागार बनलेले वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वकार युनूसने तीन आठवड्यांपूर्वीच हे पद स्वीकारले होते, मात्र आता त्यांनी ते सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्टनुसार, वकार युनूस या भूमिकेत पूर्णपणे कम्फर्टेबल वाटत नव्हता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काही प्रभावशाली अधिकारी वकार युनूसला पूर्णपणे पाठिंबा देत नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
वसीम अक्रमनेही दिला होता नकार
वकार युनूसच्या आधी अनुभवी खेळाडू वसीम अक्रमला या पदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्याने ही ऑफर नाकारली होती. यानंतर अनुभवी खेळाडू वकास युनूसने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात हे पद भूषवले. मात्र, त्यांना या पदावर फार काळ राहायचे नव्हते.
वृत्तात पुढे म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या पदासाठी नवीन जाहिरातही जारी केली आहे. आता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. आत्तापर्यंत हे पद फक्त माजी खेळाडूला देण्यात आले होते.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)