Mumbai Vs Assam In SMAT 2025: 3 वर्षांपासून टी-20 च्या संघाबाहेर, आता गोलंदाजीतून बीसीसीआयला प्रत्युत्तर, 7 चेंडूत 4 विकेट्स पटकावल्या
Mumbai Vs Assam In SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत मुंबई आणि आसाम यांच्यातील गट टप्प्यातील सामना लखनौ येथे खेळवण्यात आला.

Mumbai Vs Assam In SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत मुंबई आणि आसाम (Mumbai Vs Assam In SMAT 2025) यांच्यातील गट टप्प्यातील सामना लखनौ येथे खेळवण्यात आला. मुंबईने हा सामना एकतर्फी जिंकला, आसामला 98 धावांच्या मोठ्या फरकाने हरवले. मुंबईकडून सरफराज खानने चांगली फलंदाजी केली, तर कर्णधार शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मुंबईच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
सरफराज खानने 47 चेंडूत झळकावले शतक- (Mumbai Vs Assam)
आसामचा कर्णधार रियान परागने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. सरफराज खानने 47 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. सरफराज खानने 212.77 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या डावात त्याने 8 चौकार आणि 7 षटकार लगावले.
शार्दुल ठाकूरची आक्रमक गोलंदाजी- (Shardul Thakur Mumbai Vs Assam In SMAT 2025)
मुंबईने दिलेल्या 221 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आसाम संघ 19.1 षटकांत फक्त 122 धावांतच गारद झाला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 3 षटकांत 23 धावा देत 5 विकेट्स पटाकवल्या. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरने 7 चेंडूत 4 विकेट्स पटकावल्या.
SHARDUL THAKUR PICKED 4/8 IN JUST 1.1 OVERS IN THE SMAT. 🤯 pic.twitter.com/r8GxWyEfyC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 2, 2025
शार्दुल ठाकूर 3 वर्षांपासून भारताच्या टी-20 संघातून बाहेर-
शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून भारताच्या व्हाईट-बॉल संघातून बाहेर आहे. शार्दुल ठाकूरने 2023 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शार्दुल ठाकूरने शेवटचा टी-20 सामना खेळला होता. शार्दुलला कसोटीतही मर्यादित संधी मिळतात.
शार्दुल ठाकूर आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार- (Shardul Thakur IPL 2026 Mumbai Indians)
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावापूर्वी, शार्दुल ठाकूरला ट्रेंडद्वारे लखनौ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सने खरेदी केले. आता शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळताना दिसेल. शार्दुलने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. शार्दुल ठाकूरने 105 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत आणि 325 धावा केल्या आहेत.





















