एक्स्प्लोर

Ind vs SA 2nd ODI Playing XI: ऋतुराज गायकवाड OUT, ऋषभ पंत IN...; भारत वि. दक्षिण अफ्रिकेचा आज दुसरा वनडे सामना, कशी असेल Playing XI?

Ind vs SA 2nd ODI Playing XI: आज भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर भारत आणि दक्षिण अफ्रिकेत सामना रंगेल. दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

Ind vs SA 2nd ODI Playing XI: भारत आणि दक्षिण अफ्रिका (Ind vs SA 2nd ODI) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रोहित शर्माने आक्रमक 57 धावा आणि विराट कोहलीने 135 धावा ठोकल्या. आज (3 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर भारत आणि दक्षिण अफ्रिकेत सामना रंगेल. दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

रायपूरमधील खेळपट्टी कशी असेल? (Ind vs SA 2nd ODI Pitch Report)

रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे, जानेवारी 2023 मध् भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी आक्रमक गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला 108 धावांमध्येच गुंडाळले. हा सामना भारताने 30 षटके शिल्लक असताना आठ विकेट्सने जिंकला. या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये चांगली स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, येथील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक अनुकूल राहिल्या आहेत. लांब चौकारांमुळे षटकार मारणे कठीण होऊ शकते, परंतु वेगवान आउटफिल्डमुळे फलंदाजांना मदत होईल. 

भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता-

पहिल्या सामन्यातील निकाल असूनही, भारतीय संघात एक किंवा दोन बदल दिसू शकतात. सर्वात मोठा प्रश्न ऋतुराज गायकवाडचा आहे, ज्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते परंतु त्याला चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे ऋतुराजच्या जागी ऋषभ पंतला संघात संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदरलाही फलंदाजीच्या क्रमात वारंवार बदलांचा सामना करावा लागत आहे. तो पहिल्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर आला होता पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तसेच सुंदरने गोलंदाजीत फक्त तीन षटके टाकली. याउलट, कुलदीप यादवने 68 धावा देऊन चार विकेट्स पटकावल्या. वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग खेळतील हे जवळजवळ निश्चित आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Ind vs SA 2nd ODI Team India Playing XI)

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Ind vs SA 2nd ODI South Africa Playing XI)

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी जिओर्गी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर आणि ओटनील बार्टमन

भारतचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad Against South Africa)

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

संबंधित बातमी:

Ind vs Sa 2nd ODI : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रेड्डीला संधी का नाही?, संघ निवडीत काहीतरी गडबड...; दुसऱ्या वनडे सामन्याआधी दिग्गज क्रिकेटपटू संतापला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेचावरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Embed widget