(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shaheen Afridi Wedding : शाहीन झाला शाहिद आफ्रिदीचा जावई, अंशासोबत निकाह; सोहळ्याला पाकिस्तानी क्रिकेटर्सची हजेरी
Shahid Afridi Daugher Marriage : पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) पूर्व क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुली अंशा आफ्रिदीसोबत (Ansha Afridi) लग्नबंधनात अडकला आहे.
Shaheen Afridi Wedding : पाकिस्तानचा क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) माजी कप्तान शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलीसोबत लग्नबंधनात (Shahid Afridi Daugher Daughter) अडकला आहे. 3 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा याचा निकाह कराची येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. त्यामुळे शाहीन आफ्रिदी आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीचा जावई झाला आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
शाहीन आफ्रिदी शाहिद आफ्रिदीचा जावई
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी शुक्रवारी विवाहबंधनात अडकला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत लग्न केलं आहे. कराची शहरात निकाह सोहळा पार पडला. यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद, सध्याचा कर्णधार बाबर आझम, शादाब खान यासारख्या स्टार क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.
Congratulations Super Star @iShaheenAfridi on your Nikah Ceremony... Masha Allah 🎊😍👏❤️🙌🙌🙌
— Qadir Khawaja (@iamqadirkhawaja) February 3, 2023
اللہ کریم آپ دونوں کو اتفاق اور محبت سے رہنا نصیب فرمائے آمین ثم آمین#ShaheenShahAfridi #anshaafridi pic.twitter.com/zJgKXZwPs2
दोन वर्षापूर्वी साखरपुडा
शाहीन आणि अंशाचा साखरपुडा दोन वर्षाआधीच झाला होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या विवाह सोहळा लांबला. त्यानंतर ता लग्नसोहळा पार पडला आहे. कराची शहरात मोठ्या धूमधडाक्यात शाहीन आणि अंशा विवाहबंधनात अडकले. अंशा आणि शाहीनचे पाहुण्यासोबतचे लग्न समारंभतील फोटो व्हायरल झाले आहेत. लग्नात शाहीन आणि अंशा पारंपारिक पोशाखामध्ये दिसले. ही जोडी फार सुंदर दिसत होती.
शाहीन आफ्रिदी आणि अंशाचा विवाह
शाहिद आफ्रिदीने 2021 मध्ये शाहीन आणि त्याची मुलगी अंशा यांच्या लग्नाची खुशखबर दिली होती. मात्र, त्यांच्या लग्नाला बराच उशीर झाला. आफ्रिदीची इच्छा होती की त्याच्या मुलीने आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे. शाहीन अंशासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. टी-20 विश्वचषकानंतर शाहीन आफ्रिदी सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आता त्याची प्रतिक्षा संपली असून त्याने अंशासोबत लग्नगाठ बांधली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर्सची सोहळ्याला हजेरी
शाहीन आफ्रिदीच्या लग्नसोहळ्याला सरफराज अहमद आणि बाबर आझम यांच्यासोबतच नसीम शाह, शादाब खान, पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज यांनीही हजेरी लावली होती. शाहीनपूर्वी पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांनीही लग्न केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम